सांख्यिकीय भौतिकशास्रज्ञ डॉ. दीपक धर  sakal
पुणे

अभिमानास्पद ! देशाला मिळाला पहिला बोल्ट्झमन पुरस्कार

सांख्यिकीय भौतिकशास्रज्ञ डॉ. दीपक धर यांना घोषित

सकाळ वृत्तसेवा

पुणे: विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार सांख्यिकीय भौतिकशास्रज्ञ डॉ. दीपक धर यांना घोषित झाला आहे. त्याच्या रूपाने भारताला पहिल्यांदाच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

नोबेल पुरस्कारा इतकाच प्रतिष्ठेचा हा पुरस्कार दर तीन वर्षांनी घोषित करण्यात येतो. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर ॲण्ड ॲप्लाइड फिजिक्स या संस्थेच्या स्टॅटीस्टीकल कमिशनद्वारे हा पुरस्कार घोषित करण्यात येतो. १९७५ पासून या पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून, २०२२ या वर्षासाठी डॉ. धर आणि अमेरिकेतील प्रिंन्सटन विद्यापीठाच्या डॉ.जॉन हॉपफिल्ड यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील भरीव आणि महत्त्वपूर्ण संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. भौमितिक रचनांची कार्यप्रणाली (फ्रॅक्ट्रल्स), स्व-संघटित क्लिष्ट रचना, प्राण्यांशी निगडित संख्याशास्रीय समस्या, चुंबक आणि काचेमधील बदलत्या रचनांचा सख्याशास्रीय अभ्यास हे डॉ. धर यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्ये आहे. प्रसिद्ध भौतिकशास्रज्ञ डॉ. रिचर्ड फाइन्मन यांचे विद्यार्थी असलेले डॉ. धर सध्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (आयसर) येथे भौतिकशास्त्र विभागात प्रतिष्ठीत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याना मिळालेला हा पुरस्कार देशासाठी अभिमानाची गोष्ट असल्याची भावना वैज्ञानिक समुदायातून व्यक्त केली जात आहे.

जीवन परिचय

डॉ. दीपक धर (जन्म ः ३० ऑक्टोबर १९९१)

  • - उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे जन्म

  • - अलाहबाद विद्यापीठातून विज्ञानाचे पदवीधर

  • - आयआयटी कानपूर मधून १९७२ मध्ये पदव्युत्तर पदवी

  • - अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पीएच.डी.

  • - १९७८ मध्ये भारतात परतल्यावर टाटा मूलभूत विज्ञान संस्था येथे संशोधनाला सुरवात

  • - पॅरिस विद्यापीठात (१९८४-८५) व्हिजिटिंग प्राध्यापक

पुरस्कार आणि सन्मान

  • फेलो द वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी

  • १९९१ मध्ये देशातील सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कार शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित

  • आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकशास्त्र केंद्राने त्यांना १९९३ च्या जे. रॉबर्ट श्रिफर पुरस्कारासाठी निवड केली.

  • आयएनएसएने २००१ मध्ये धर यांना पुन्हा सत्येंद्रनाथ बोस मेडल देऊन सन्मानित केले

  • २०००२ मध्ये द वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे टीडब्ल्युएएस पारितोषिक मिळाले.

प्रथमच मला काय बोलावे हे सुचत नाही. निश्चितच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जसे न्यूटन म्हटले आहे की, वैज्ञानिक हे महासागराच्या किनाऱ्यावरील शिंपले गोळा करणारे लहान मुलं असतात. अचानक एखाद्याला हाताला अनमोल शिंपला लाभतो. तसेच जगातील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक गणितावर काम करण्याचे भाग्य एखाद्या वैज्ञानिकाल्ा मिळते. त्यापैकी मी एक आहे.

प्रा. डॉ. दीपक धर, बोल्ट्झमन मेडल प्राप्त वैज्ञानिक, आयसर, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT