पुणे - ‘शेती, उद्योग आणि सेवा हे मानवाच्या विकासाचे तीन महत्त्वपूर्ण टप्पे आहे. शेती क्षेत्रात प्रगती केली; मात्र त्यापेक्षा अधिक उद्योगक्षेत्रात क्रांती झाली. अलीकडच्या काळात उद्योगापेक्षा मोठ्याप्रमाणात आयटी क्षेत्रात प्रगती झाली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या युगात यशस्वी व्हायचे असल्यास स्वतःला सिद्ध करणे काळाची गरज आहे,’’ असे मत लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेने आयोजित केलेल्या ‘दहावी, बारावीनंतर काय ?’ या विषयावरील व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले.
गोडबोले म्हणाले, ‘‘राजकीय इच्छाशक्ती असल्यास शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडू शकते; मात्र तसे घडत नाही. जीडीपीच्या सहा टक्के आर्थिक तरतूद शैक्षणिक क्षेत्रासाठी व्हायला पाहिजे. आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्राकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. जागतिकीकरणाच्या शर्यतीत पुढे जाण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि सरकारमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे.’’
या उपक्रमांतर्गत तुषार काकडे यांनी बॅंकिंग व कॉमर्स विभागातील संधी, संतोष रासकर यांनी ॲनिमेशन तसेच डिझाईन क्षेत्र, प्रा. विजय नवले यांनी अभियांत्रिकीमधील नवीन संधी तर अर्चना भोसले यांनी करिअर कौन्सिलिंगचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले.
अधिक माहितीसाठी - https://www.facebook.com/pg/YINforChange या पेजला भेट द्यावी.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.