PSI pooja gaikwad chaugule sakal
पुणे

PSI Exam Result : पतीने ओळखली हुशारी, पत्नीने मिळवली वर्दी; पूजा गायकवाड-चौगुले हिचे ‘पीएसआय’ पदाच्या परीक्षेत यश

बिगारीकाम आणि मोलमजुरी करणारे आईवडील. माहेरी आणि सासरी दोन्हीकडे अठराविश्‍व दारिद्र्य. मात्र, तिच्याकडे हुशारी आणि चिकाटी हे भांडवल होते.

सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर - बिगारीकाम आणि मोलमजुरी करणारे आईवडील. माहेरी आणि सासरी दोन्हीकडे अठराविश्‍व दारिद्र्य. मात्र, तिच्याकडे हुशारी आणि चिकाटी हे भांडवल होते. पतीने तिची हुशारी हेरली आणि ‘फक्त वर्दी मिळव’ एवढाच हट्ट धरून सावलीसारखा हरघडीला सोबत उभा राहिला. तिनेही सलग पाच वर्ष सातत्यपूर्ण कष्ट घेतले. कॉन्स्टेबल पदासाठी अभ्यास सुरू केला होता, पण थेट ‘पीएसआय’चीच वर्दी खेचून आणली.

वाणेवाडी (ता. बारामती) येथील पूजा गायकवाड-चौगुले ही अत्यंत सामान्य कुटुंबातील तरुणी केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर तिसऱ्याच प्रयत्नात अधिकारीपदावर पोचली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२२च्या परीक्षेत तिने २५६.५० गुण मिळवून अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिल्या दहात स्थान पटकावले आहे. तिच्या निकालाने सासर आणि माहेर दोन्हीकडे आनंदाश्रूचा अभिषेक आणि जल्लोषाचे वातावरण आहे. वाणेवाडीत पीएसआय झालेली ती पहिली महिला ठरली आहे.

पूजा ही वाघळवाडीतून वाणेवाडीत स्थलांतरित झालेल्या माणिक व सुमित्रा गायकवाड या दांपत्याची मुलगी. वाघळवाडी जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक, सोमेश्वर विद्यालयात माध्यमिक; तर न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडीत उच्च माध्यमिक शिक्षण घेतानाच हुशारीची चुणूक दिसली. काकडे महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयात उच्च श्रेणी प्राप्त केली.

बारावीनंतर शारदानगरला पोलिस अकादमीत वर्षभर अभ्यास केलेलाच होता. पती राहुल याच्या आग्रहाने सन २०१९मध्ये करंजेपूलच्या विवेकानंद अभ्यासिकेत जाऊन अभ्यास सुरू केला. कॉन्स्टेबलचाच काय तर पीएसआयचा अभ्यास झेपतोय, हे लक्षात आले.

सकाळी सहा ते रात्री दहा अभ्यास आणि मधल्या काळात मैत्रिणींसोबत गटचर्चा होत होती. सन २०२१च्या पीएसआयच्या प्राथमिक परीक्षेत, तर २०२३च्या मुख्य परीक्षेत अडकली. मात्र, घरच्या पाठिंब्याने सन २०२२च्या परीक्षेत झेंडा फडकविला. प्राथमिक आणि मुख्य दोन्ही परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविले. निवृत्त पोलिस अंकुश दोडमिसे, बद्रुद्दीन काझी यांच्या मार्गदर्शनामुळे मैदानी आणि गणेश सावंत यांच्या मार्गदर्शनामुळे मुलाखत सोपी केली.

सासरच्यांनी दिली खंबीर साथ

पूजाचा पती राहुल (बुवा) फार शिकलेला नाही. कुठेही काम करून चार पैसे उभे करतो. मात्र, ‘वर्दीला लय किंमत असते, रुबाब असतो. आपल्या खानदानात कोणी अधिकारी नाही. त्यामुळे अधिकारीच बन,’ असा हट्ट धरला. अभ्यासिकेत ने-आण, आर्थिक उभारणी, मैदानी सराव, आहाराची सोय हे त्याने न थकता केले. अर्ज भरण्यापासून मुलाखतीपर्यंत सावलीसारखा सोबत राहिला. शिवाय सासू, सासरे, दीर, जाऊ यांनीही तिला अटकाव केला नाही. रात्री दहाला अभ्यासाहून परतल्यावर आयते ताट मिळत होते. या पाठिंब्यानेच पूजा यशस्वी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT