PSI Revati Bhosale sakal
पुणे

PSI Exam Result : आधी हाकला गावगाडा, आता गुन्हेगारांवर वचक; नीरेतील रेवती भोसलेची पीएसआय पदावर निवड

आयर्न लेडी इंदिरा गांधी या तिच्या आदर्श आणि मराठी माध्यमात शिकून तिच्यातही कणखरपणा आलेला. अशात तिने ग्रामपंचायत सदस्य म्हणून कामाचा ठसा उमटवला.

सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर - आयर्न लेडी इंदिरा गांधी या तिच्या आदर्श आणि मराठी माध्यमात शिकून तिच्यातही कणखरपणा आलेला. अशात तिने ग्रामपंचायत सदस्य म्हणून कामाचा ठसा उमटवला. महिला बचत गटांसोबतही उल्लेखनीय कामही केले. यातूनच, ‘मी अधिकारी होऊ शकते,’ हा आत्मविश्वास मिळाला.

सन २०१९च्या पीएसआय परीक्षेत अवघ्या दोन गुणांनी यश दुरावले. मग स्मार्टफोनसह अनेक गोष्टींचा त्याग करून सन २०२२ च्या परीक्षेत यश खेचून आणत अखेर ती पीएसआय झाली. नीरा (ता. पुरंदर) येथील रेवती भोसले या युवतीच्या यशाची ही कहाणी आहे.

नीरेचे माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले व वंदना भोसले या शेतकरी दांपत्याची रेवती ही मुलगी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात २९७.५० गुण मिळवून रेवती हिने अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे.

रेवती हिचे प्राथमिक शिक्षण नीरा-शिवतक्रार जिल्हा परिषद शाळेत, तर लि. रि. शहा कन्याशाळेत माध्यमिक शिक्षण झाले. मराठी माध्यमातून शिकल्याने ती कणखर बनली. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात ‘बीसीएस’ पदवी घेतली. त्यानंतर नोकरी करायचीच नाही, हा निर्धार करत स्वतःची एनजीओ संस्था स्थापन करून महिला सबलीकरणाचे काम सुरू केले. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडूनही आली.

सोबतीने कर सहाय्यक, मंत्रालय सहायक परीक्षांमध्ये स्वतःला आजमावले, पण अपयश आले. सन २०१९ मध्ये तिच्या महिला मेळाव्यासाठी आलेल्या पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांनी तिला पीएसआयचा सल्ला दिला. तिनेही मग २०१९ला पीएसआयची पहिल्यांदा परीक्षा दिली, मात्र दोन गुणांनी अपयश आले.

करिअर मार्गदर्शक उमेश कुदळे यांच्या प्रेरणेने सन २०२२ ला प्री आणि मेन्स परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. मैदानी चाचणी ही कमजोरी ठरू नये म्हणून थेट कोल्हापूर गाठून सरदार भित्तम, संदीप नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली. सरावावेळी पाय जखमी झाल्यावर बेडरेस्टचा डॉक्टरी सल्ला असतानाही मैदानावर जाऊन बसायची. चाचणीआधी पाय बरा झाला आणि मैदानातही उच्चांकी गुण मिळाले. मुलाखतीत आत्मविश्वासाने वावरल्याने अखेर ती फौजदार बनली आणि नीरा ग्रामस्थांनी जंगी मिरवणूक काढली.

आईवडीलच माझे आदर्श आहेत. वय पुढे सरकत असतानाही आईवडिलांनी संपूर्ण पाठिंबाही दिला. मीही शेवटचीच लढाई मानून चार वर्ष स्मार्टफोन, सण-समारंभ यांचा पूर्ण त्याग गेला. मासे आणि मिसळ या आवडत्या गोष्टी यश मिळेपर्यंत घ्यायच्या नाहीत, हा पण पाळला. कोचिंग क्लासेसचीही गरज पडली नाही.

- रेवती भोसले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT