public demand to repair bus stop station Sakal
पुणे

Pune News : कात्रज-हडपसर मार्गावरील बसथांब्यांची दुरवस्था; नागरिक उन्हामुळे त्रस्त

कात्रज-हडपसर मार्गावर बसथांबे असून खोळंबा आणि नसून घोटाळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक विद्यार्थी आणि महिला प्रवाशांच्या उन्हामुळे हाल होत असून बसशेडची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कोंढवा : कात्रज-हडपसर मार्गावर बसथांबे असून खोळंबा आणि नसून घोटाळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक विद्यार्थी आणि महिला प्रवाशांच्या उन्हामुळे हाल होत असून बसशेडची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

जिथे बसशेड आहेत त्याचा प्रवाशांना फायदा होताना दिसत नाही. मात्र, त्यावरील जाहिराती मात्र ठळकपणे दिसत आहेत. ऊन, वारा, पावसात ताटकळत बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपी प्रशासन डोळेझाक करत असल्याचे यातून दिसून येते.

या मार्गावर अनेक ठिकाणी बसथांबेही नाहीत. यामुळे प्रवाशांना रणरणत्या ऊन्हात बसची वाट पाहावी लागत आहे. काही ठिकाणी स्टीलचे बसथांबे पाहायला मिळतात. मात्र त्याचा कसलाही उपयोग प्रवाशांना होताना दिसत नाही.

बसण्यासाठी अवघी सहा इंच रुंदीची लांबलचक पट्टी, चार गोलकार पाईपांवर उभा असलेला बसथांबा ना उन्हापासून, ना वाऱ्यापासून प्रवाशांना सुरक्षित ठेवू शकत नाही. बस थांबा आहे का, तर आहे. पण विचार केला तर त्याचा कसलाही उपयोग नाही.

कोंढवा मुख्य बसथांबा सोडला तर अनेक ठिकाणी दुरवस्था झालेले बसथांबे दिसून येतात. दुरुस्तीच्या नावाखाली काढलेले बसथांबे परत बसविलेच नाहीत, अशी परिस्थिती असल्याचेही प्रवाशी सांगतात. सध्या पारा ४० अंशाच्या घरात आहे. असाय्य उखाड्यामुळे अनेक नागरिक घर सोडत नाहीत. पण हातावरचे पोट असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला बाहेर जावेच लागते.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने नवीन बसथांबे करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच, जुने ज्या ठिकाणी बसथांबे असतील ते दुरुस्त करुन घेण्यात येतील.

- निरंजन तुळपुळे, पीएमपीएल मुख्य स्थापत्य अभियंता

पीएमपीची बससेवा ही आमच्यासाठी महत्वाची आहे. पण ती आता रामभरोसे, झाल्याचे दिसून येते. ती कधी रस्त्यात बंद पडेल सांगता येत नाही. अनेक ठिकाणी बसथांबे नाहीत. जिथे आहेत त्यांची दुरवस्था झालेली आहे. सकाळी दहा वाजताही किती उनाचा पारा चढलेला असतो ते आपण बघतो. अशा वेळी उनापासून वाचण्यासाठी चांगल्या बसथांब्यांची गरज आहे.

- गीता पाथरकर, प्रवाशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT