Eknath Shinde sakal
पुणे

Pune: मुख्यमंत्र्यांच्या ‘एसआयटी’ला केराची टोपली, अहवालाकडे दुर्लक्ष करत ‘आरटीओ’ अधिकाऱ्याची बदली

सकाळ वृत्तसेवा

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा

Latest Pune News: राज्याच्या परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीत आर्थिक गैरव्यवहार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून त्याचा अहवाल देण्यास सांगितले होते. ‘एसआयटी’च्या अहवालात विजय चव्हाण यांचा गैरव्यवहारात सहभाग असून, त्यांची नियुक्ती विदर्भाच्या बाहेर करण्यास शासनाला कळविले. मात्र, परिवहन विभागाने त्यांची नियुक्ती नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर केली.

चव्हाण वादग्रस्त अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी शासनाची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे. चव्हाणसारख्या अधिकाऱ्यांवर परिवहन विभाग मेहरबान का? याचा अर्थ स्पष्ट होत नाही. चव्हाण यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे परिवहनमंत्री पदाचा कार्यभार आहे.

विजय चव्हाण यांच्यावरील आरोप

1) चव्हाण हे गडचिरोलीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असताना, त्यांनी शासनाला पत्र लिहून खोटी माहिती देऊन गोंदिया आरटीओ कार्यालयात कार्यरत असल्याचे कळवले. गडचिरोली संवेदनशील भाग असल्याने तेथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारी दिली जात नाही. मात्र, चव्हाण यांना नागपूर कार्यालयाची लालसा असल्याने त्यांनी नागपूर आरटीओ कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार मिळावा. यासाठी शासनाला गोंदिया येथे कार्यरत असल्याचे सांगितले. खोट्या माहितीच्या आधारे हे पद मिळविल्याने त्याची चर्चा विधानसभेत झाली. त्यावेळी चव्हाण यांच्या गैरप्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, केवळ खुलासा मागविण्यात आला. त्यावर अद्याप कोणतेही कारवाई झालेली नाही.

2) आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये निवृत्त अधिकारी लक्ष्मण खाडे यांचा हस्तक्षेप आढळल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘एसआयटी’ स्थापन करून नागपूर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे ‘एसआयटी’च्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे चव्हाण यांच्यासह अन्य सात जणांना विदर्भाच्या बाहेर नियुक्ती द्यावी, असा अहवाल त्यांनी दिला. त्याला केराची टोपली दाखवत चव्हाण यांनी पुन्हा नागपूरमध्ये बदली केल आहे.

न्यायालयाचा अवमान

रवींद्र भुयार आरटीओतील वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या एका प्रकरणात नागपूरमधील न्यायालयात दावा दाखल आहे. निकाल लागेपर्यंत त्यांची नागपूरव्यतिरिक्त अन्यत्र बदली करू नये, असा आदेश न्यायालयाने परिवहन विभागाला दिला. आदेशाला न जुमानता भुयार यांना अकोल्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी बदली केली आहे. ‘एसआयटी’च्या अहवालात चव्हाण यांना विदर्भाच्या बाहेर नियुक्त करा, असे सांगितले आहे. परंतु, न्यायालयाने भुयार यांना नागपूरव्यतिरिक्त अन्य कुठेही बदली करू नये, असे सांगितले आहे. या दोघांच्या बाबतीत परिवहन विभागाने नेमकी उलटी भूमिका घेतली आहे.

‘‘प्रशासकीय कारणांसाठी परिवहन विभागात बदल्या झाल्या आहेत, त्यावर अधिक बोलणार नाही.’’

- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Fasal Bima Yojana : रत्नागिरी जिल्ह्याला ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर; आंबा, काजू बागायतदार पात्र

Post Office Schemes : पोस्टाच्या खात्यावर आता मोठ्या रकमेचे व्यवहार,पोस्ट-आयपीपीबीचे खाते करा लिंक

Jammu Kashmir Election: मोदींमुळे पाक सीमेवर शांतता, अमित शहा यांचा दावा; काश्‍मीरमधील घराणेशाहीवर टीका

Sharad Pawar: 1 जागा अन् तिन्ही पक्षांना लढवायची असेल तर..? शरद पवारांनी सांगितली रणनीती, अंतिम उमेदवारांची घोषणा कधी?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात नवरा माझा नवसाचा 2 टीमची हजेरी ; स्पर्धकांबरोबर डान्स आणि धमाल

SCROLL FOR NEXT