पुणे

पुण्यातील इंजिनिअर्सनी तयार केला 'Oxygen concentrator’

प्रतीमिनीट सहा लिटरला ९२ टक्के कॉन्सन्ट्रेशन; प्रतिक्षा फक्त प्रयोगशाळेच्या प्रमाणपत्राची

सम्राट कदम

पुणे : वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता पुण्यातील चौघांनी चक्क ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकसित केला आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर करण तरडे, निधी जगताप, चंद्रसेन गायकवाड आणि कार्तिक मांढरे यांनी अनश्वर टेक्नॉलॉजी नावाचे स्टार्टअप सुरू केले आहे. त्यामाध्यमातून त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांवर खरा उतरेल असा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकसित केला आहे. आता त्यांना प्रतिक्षा आहे फक्त प्रयोगशाळेच्या प्रमाणपत्राची! (Pune 4 Engineers develop Oxygen concentrator हsing Closed Ventilator Gas Analyzer Waiting for authentication)

बंद पडलेल्या व्हेंटिलेटरचा ‘गॅस अ‍ॅनलायझर’, कार्यशाळेतील साहित्य आणि दुर्दम्य इच्छाशक्तीवर या चौघांनी हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बनवला. या टीमचा प्रमुख करण तरडे सांगतो,‘‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय ऑक्सिजनची गरज निर्माण झाली. देशभरात तुटवडा भासायला लागला. म्हणून आम्ही चौघांनी उपलब्ध माहिती आणि आजवरच्या अभियांत्रिकीच्या ज्ञानावर हा कॉन्सन्ट्रेटर विकसित केला. दोन लिटरपासून अगदी १० लिटरपर्यंत आम्ही याच्या चाचण्या घेतल्या आहे.’’ विशेष म्हणजे कॉन्सन्ट्रेटर तयार झाल्यानंतर त्याचे परिक्षण करणे गरजेचे होते. त्यासाठी अनेक संशोधन संस्थांमध्ये प्रयत्न केले पण पाहिजे ती मदत मिळाली नाही. म्हणून यांनी स्वतःच एका गॅस अ‍ॅनलायझरद्वारे टेस्टींग कीट विकसित केले आणि प्रमाणित साहित्याच्या आधारे कॉन्सन्ट्रेटरचे परिक्षण केले.

कॉन्सन्ट्रेटरची वैशिष्ट्ये

- प्रेशर स्विंग ॲडसॉरपशन तंत्रज्ञानाचा वापर

- प्रती मिनीट दोन ते १० लिटरपर्यंतचा ऑक्सिजन प्रवाह

- हवाशुद्धीसाठी फोम आधारित तंत्रज्ञान

- संयंत्र खराब झाल्यास गजराची व्यवस्था

- आत्तापर्यंतच्या चाचणीत २७ बाय ७ चालतो

तांत्रिक तपशील

१) मिळणारे उत्पादन

प्रती मिनीट ऑक्सिजन प्रवाह (लिटर) ः कॉन्सन्ट्रेशन (टक्के)

  • २ ९६

  • ४ ९४

  • ६ ९२

  • ८ ८५

  • १० ८२

२) वजन ः २६ किलो

३) विद्यूत प्रवाह ः ७५० वॉट

४) सेन्सर ः हनीवेल इन्व्हीटेक OOM202

''चीन मधून येणारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरपेक्षा आम्ही विकसित केलेला कॉन्सन्ट्रेटर अधिक सक्षम आहे. कारण याचा प्रती मिनिटासाठीचा प्रवाह जरी वाढविला तरी ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रेशन कमी होत नाही. आमच्या पातळीवर परिक्षण पूर्ण झाले आहे. आता आम्हाला गरज आहे ती प्रयोगशाळेच्या प्रमाणपत्राची. त्यासाठीचे प्रयत्नही आम्ही सुरु केले आहे.''

- करण तरडे, प्रमुख, अनश्वर टेक्नॉलॉजी, स्टार्टअप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT