Covishield and Covaxin Sakal
पुणे

पुणे : कोव्हीशील्डचे १८६ केंद्रावर गुरुवारी मिळणार ६२ हजार डोस

महापालिकेने शहरात लसीकरण केंद्रांची संख्या २०० पर्यंत नेली आहे. शहरात एकाच दिवशी ५० हजार पर्यंत लसीकरण करण्याची क्षमता महापालिकेची आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून महापालिकेला (Municipal) तुटपुंजी लस मिळत असल्याने लसीकरण (Vaccination) अडखळत सुरू होते. मात्र, बुधवारी महापालिकेला तब्बल ६२ हजार कोव्हीशील्डचे डोस (Covishield Dose) मिळाले आहेत. उद्या (गुरुवारी) (Thursday) १८६ केंद्रांवर कोव्हीशील्डचे प्रत्येकी २०० डोस दिल्याने जास्त नागरिकांचे लस मिळणार आहे. तर ६ ठिकाणी कोव्हॅक्सीनची (Covaxin) लस उपलब्ध आहे. (Pune 62000 Doses Available Tomorrow Thursday at 186 Centers of Covishield)

महापालिकेने शहरात लसीकरण केंद्रांची संख्या २०० पर्यंत नेली आहे. शहरात एकाच दिवशी ५० हजार पर्यंत लसीकरण करण्याची क्षमता महापालिकेची आहे. पण शासनाकडून पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याने लसीकरणात अडथळे येत होते. महापालिकेला २० हजार डोस मिळाले तर सर्व केंद्र सुरू करता येतात, पण कमी लस मिळाली तर नगरसेवकांनी सुचविलेले केंद्र बंद करून केवळ पालिकेच्या दवाखान्यांमध्ये लसीकरण केले जाते.

लसीकरण अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर म्हणाले, ‘महापालिकेला पहिलेंदाच ६२ हजार डोस मिळाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोव्हीशील्डच्या प्रत्येक केंद्रांवर १०० ऐवजी २०० डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी सर्वोच्च लसीकरण होण्याची शक्यता आहे.

कोव्हीशील्ड

- पहिल्या डोससाठी २० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

- पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (५ मे) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी ३० टक्के लस आॅनलाइन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी ३० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सीन

- ६ केंद्रांवर प्रत्येकी ३०० डोस

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

-१ जुलै पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

ग्रामीणसाठी कोरोना लसीचे ९३ हजार डोस उपलब्ध

पुणे : जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी बुधवारी (ता. २८) कोरोना लसीचे ९३ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये कोव्हिशिल्डचे ७८ हजार ५०० तर, कोव्हॅक्सिनचे १५ हजार डोस असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ३५ लाख २२ हजार ९१८ नागरिक कोरोना लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी आतापर्यंत १५ लाख ८७ हजार ३१५ नागरिकांचा कोरोनाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. याशिवाय ५ लाख ८५ हजार २०८ नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात ८ हजार ८८६ नागरिकांचा पहिला तर, १४ हजार ९०६ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT