पुणे

Pune Accident: डंपरची दुचाकीला धडक, आईचा मृत्यु तर मुलगा गंभीर जखमी

Wagholi Crime: डंपर चालक राहुल शिवाजी लोखंडे ( वय ४०, रा. खांदवेनगर, वाघोली ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune Latest Update: डंपरची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील ज्येष्ठ महिला मृत्यूमुखी पडली. तर मुलगा जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि १० ) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास वाघोली - आव्हाळवाडी रोडवर बाजारतळ मैदानाजवळ घडली.

अलका जुनगडे (वय ६६, रा वाघोली ) या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा पियुग जुनगडे

( वय ३६, रा वाघोली ) हे जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनगडे आई लेक दोघे दुचाकीवर जात होते. पाठीमागून आलेल्या भरघाव डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये आईचा मृत्यू झाला. तर मुलगाही गंभीर जखमी झाला. डंपर चालक राहुल शिवाजी लोखंडे ( वय ४०, रा. खांदवेनगर, वाघोली ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जड वाहतुकीला सकाळी व संध्याकाळी बंदी आहे. जो वेळ मिळतो त्या वेळेत जास्तीत जास्त मालाच्या फेऱ्या करण्यासाठी डंपर चालक अती वेगात डंपर चालवतात. त्यांच्या वेगाला नियंत्रणच नसते. या डंपर मुळे अनेकांचे बळी गेले आहे. मात्र त्यांच्या वेगावर कोणीही नियंत्रण घालत नाही. अनेक वेळा चालक मोबाईल वर बोलत डंपर चालवतात. त्यांचे आजू बाजूला लक्षही नसते. त्यामुळे ही अनेक अपघात घडतात. त्यांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT