pune accident news 
पुणे

Pune Accident: त्याने 48 हजार नाही, तर त्यापेक्षा जास्त पैसे पार्टीसाठी खर्च केले; पोलिसांनी खरा आकडा कोर्टात सांगितला

Pune Accident Accuse party expenses: पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन आरोपीने मद्य पिऊन पोर्शे कार चालवली अन्. त्याने दोघांना उडवलं होतं.

कार्तिक पुजारी

पुणे- पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन आरोपीने मद्य पिऊन पोर्शे कार चालवली अन् दोघांना उडवलं होतं. त्याने आपल्या मित्रांसोबत मिळून पार्टी केली होती. या पार्टीमध्ये त्याचे बील ४८ हजार रुपये झाल्याचं सांगण्यात येत होतं. पण, पुणे पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार हे बील त्यापेक्षा जास्त आहे. आरोपी तरुणाने त्यादिवशी पार्टीसाठी तब्बल ७५ हजार रुपये खर्च केले आहेत.

पुणे पोलिसांनी बाल न्याय कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, हीट ॲन्ड रन केसमध्ये अल्पवयीन आरोपीचे एकूण ७५ हजार रुपयांचे दारुचे बील झाले होते. आरोपी आधी कोझी रेस्टॉरंटमध्ये गेला, त्याठिकाणी त्याचे ४८ हजार रुपयांचे बिल झाले. त्यानंतर तो ब्लॅक पबमध्ये गेला. याठिकाणी त्याने आणखी पैसे खर्च केले. असे मिळून त्याचे एकूण बील ७५ हजार रुपये झाले.

पुण्यात रविवारच्या रात्री झालेल्या अपघातामुळे सामाजिक वातावरण तापलं आहे. आरोपी तरुण अल्पवयीन असताना त्याने मद्य प्राशन केले. त्यानंतर त्याने महागडी पोर्शे कार रस्त्यावर चालवली. त्याच्या गाडीचा वेग वाऱ्याची स्पर्धा करता येईल इतका होता. कार त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली अन् त्याने रस्त्यावरील टू-व्हीलरला धडक दिली. टू-व्हीलरवर असणाऱ्या तरुण-तरुणीचा याता जागीच मृत्यू झालाय.

अपघातानंतर आरोपी तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण, जमावाने चोप दिला अन् त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक कोर्टाने आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला १२ तासांच्या आता जामीन मंजूर केला. शिवाय त्याच्या जामीनाला अटी-शर्ती म्हणून त्याला एक निंबध लिहिण्यास सांगितलं.

आरोपीने दोघांचा जीव घेणे आणि त्याला १२ तासात साधी अट घालून जामीन देणे यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला. तो अल्पवयीन असल्याने त्याला गाडी कशी देण्यात आली? आरोपीचे वडील बिल्डर असल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप होऊ लागला. काही राजकीय नेत्यांनी देखील यात वक्तव्य केली. सध्या हे प्रकरण राज्यात गाजत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

SCROLL FOR NEXT