Accident News 
पुणे

Pune : सुखी संसाराचं स्वप्न भंगलं! देवदर्शनासाठी निघालेल्या नवदांम्पत्याची रिक्षा विहिरीत पडली अन्...

रवींद्र देशमुख

पुणे - पुणे जिल्ह्यातील सासवड येथून रिक्षा अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातात, नवदांपत्यासह एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शनाला जेजुरीला जात असताना हा अपघात घडला असून या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर माहिती अशी की, पुण्याच्या धायरीहून जेजुरी येथे देवदर्शनासाठी चाललेल्या नवदांपत्याला घेऊन जाणारी रिक्षा सासवडजवळ विहिरीत पडली. त्यात नवदांपत्यासह एका तरुणीचा मृत्यू झालाय. तर दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पुण्यातील धायरी येथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या नवविवाहितांची रिक्षा ही सासवड नजीक बोरावके मळा येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली. अपघात कसा याची माहिती मिळाली नाही. मात्र संसाराला सुरुवात होण्याअगोदरच या नवदांम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर रिक्षातील सर्वांशी कुटुंबाचा संपर्क तुटला होता.

आज सकाळी व्यायामाला जाणाऱ्या मुलांना विहिरीतून वाचवा, वाचवा असं कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दोन व्यक्ती त्यांना त्या विहिरीत दिसल्या आणि यानंतर ही माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली. सासवड पोलिसांनी दोघांना सुखरूप बाहेर काढलं आहे. मात्र नवविवाहित जोडपं आणि एका तरुणीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT