पुणे

Pune Accident Updates : 'त्या' अल्पवयीन आरोपीचा अपघातापूर्वीचा पबमधला व्हिडीओ आला समोर; पब चालकासह इतरांवर गुन्हे दाखल

अपघातामध्ये अनिष अवधिया (वय २४, रा. पाली, मध्यप्रदेश) आणि सहप्रवासी अश्विनी कोस्टा (वय २४, रा. जबलपूर, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मोटर चालकास (वय १७ वर्षे आठ महिने) येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणेः भरधाव मोटारचालकाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने आयटी अभियंता तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना येरवडा परिसरातील कल्याणीनगर जंक्शनजवळ रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात आरोपीला काही अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता त्या अल्पवयीन आरोपीचा पबमधला व्हिडीओ समोर आला आहे.

पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील, त्याला दारु देणाऱ्या दोन पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोर्शे कारने अपघात करुन दोघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेला मुलगा अल्पवयीन असूनदेखील त्याला पोर्शे कार चालवायला दिल्याबद्दल त्याचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अपघातामध्ये अनिष अवधिया (वय २४, रा. पाली, मध्यप्रदेश) आणि सहप्रवासी अश्विनी कोस्टा (वय २४, रा. जबलपूर, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मोटर चालकास (वय १७ वर्षे आठ महिने) येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी मोटारचालक हा एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. मोटारचालक तरुणाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७. मोटार वाहन अधिनियम कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अकीब रमजान मुल्ला (वय २४, रा. मथुरानगर, चंदननगर, मूळ रा. सोलापूर) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी आणि त्याचे मित्र हॉटेलमध्ये पार्टी करून घरी निघाले होते. कल्याणीनगर येथील लॅन्डमार्क सोसायटीजवळ एअरपोर्ट रस्त्यावर भरधाव मोटारीने अनिष अवधियाच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. तसेच, इतर दोन वाहनांना धडक दिली. मोटारीची धडक एवढी जोरात होती की, दुचाकीस्वार अनिष आणि त्याची मैत्रीण अश्विनी दूरवर फेकले गेले. त्यात दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या वेळी तेथील नागरिकांनी मोटारचालक तरुणाला पकडून चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

१२ तासांच्या आत जामीन

याप्रकरणात, अल्पवयीन मुलाने अ‍ॅड. प्रशांत पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर बाल न्याय मंडळात सुनावणी झाली. मुलाविरोधात लावण्यात आलेले कलम जामीनपात्र आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आम्ही पोलिसांना तपासास सहकार्य करण्यास तयार आहोत. तो न्यायालयांच्या तारखेला हजर राहील तसेच तपासास सहकार्य करेल, असा युक्तिवाद ॲड. पाटील यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मुलाचा जामीन अर्ज मंजूर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT