कोंढवा - येवलेवाडी परिसरात विविध प्रकारची आरक्षणे असताना अनधिकृतपणे प्लॉटिंग आणि बांधकामे करून सामान्य जनतेची मोठी फसवणूक केली जात आहे. हे लक्षात घेऊन महापालिकेच्या बांधकाम विभाग झोन २ने अनधिकृत प्लॉटिंगवर धडक कारवाई केली आहे.
येवलेवाडीतील सर्वे क्रमांक ३३ मधील ५ मजली इमारतीवर ६ हजार चौरस फूट क्षेत्रावरील बांधकाम जॉ-कटरच्या सहाय्याने व सर्वे क्रमांक ३१ मधील शेती नाविकास झोनमधील (हिल-टॉप हिल-स्लोप)
अनाधिकृत प्लॉटिंगमधील ६ बांधकामांचे ७ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रावरील बांधकाम पाडण्यात आले. यासह ३ हजार चौरस फूट क्षेत्रावरील गोडाऊन तसेच प्लॉटिंग विकण्यासाठी करण्यात आलेले रस्ते उखडून टाकण्यात आले.
एक जॉ-कटर, ३ जेसीबी, गॅस कटर व अतिक्रण विभागाकडील ९ बिगारी आदी सामुग्रीच्या सहाय्याने अतिक्रमण विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांच्या पथकाने ही ही कारवाई केली. कारवाईमध्ये उपअभियंता राजेश खाडे,
विजय कुमावत, शाखा अभियंता प्रशांत मोरे, इमारत निरीक्षक उमेश गोडगे, सागर सपकाळ यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. अतिक्रमण विभागाकडील पोलीस कर्मचाऱ्यांचे पथकही यावेळी उपस्थित होते.
नागरिकांनी महापालिकेची रितसर परवानगी घेऊन बांधकाम करावे. अनाधिकृत बांधकाम किंवा प्लॉटिंग करून जागा विकणे ही बाह गंभीर असून नागरिकांनी स्वतःची फसवणूक होऊ देऊ नये.
महापालिकेच्या परवानग्या जाणून घ्याव्यात, त्यानंतर कुठलीही खरेदी करावी. तसेच, महापालिका नियमितपणे अशा अनाधिकृत जागांवर कारवाई करत राहील. - राजेश खाडे, उपअभियंता बांधकाम विकास झोन क्रमांक २
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.