माळेगाव : पुण्यात एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेलो असता डॉ. हर्डीकर सिक्युरिटी गार्ड व मी स्वतः लिफ्टमध्ये अडकलो आणि काही क्षणातच ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली आदळी. बारामतीकरांनो शनिवार (ता.14) रोजी घडलेला वरील प्रसंग पत्नी सुनेत्राला आणि आईला सुद्धा सांगितलं नाही, ही दुर्घटना एवढी गंभीर होती की मी केवळ तुमच्या सर्व बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळे वाचलो आहे, अन्यथा आज माझी श्रद्धांजलीच व्हायलाच तुम्ही आला असता,
अशा शब्दात खुद्द अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात घडलेल्या अपघाताची माहिती स्पष्ट केली. अर्थात हा अपघाताचा प्रसंग ऐकताना बारामती तालुक्यातील पणदरे पवईमाळकरांच्या अंगावरती शहारे उभे राहिले होते. दादा तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य आहे, असे माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप सभेत बोलले असता ,
"अरे योगेश तुझ्या आशीर्वादामुळेच मी वाचलो " अशा शब्दात पवार यांनी निर्माण झालेले सभेतील गंभीर वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पवईमाळ (ता.बारामती) ग्रामपंचायत हद्दीमधील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सरपंच अतुल जगताप, उपसरपंच अलका कांबळे व इतर सदस्यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना निमंत्रित केले होते , त्यानुसार उपस्थितांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख बाळासाहेब तावरे उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, तानाजीराव कोकरे,अशोकराव मुळीक, ज्ञानदेव कदम, स्वप्निल जगताप, रामदास फाळके, दत्तात्रेय येळे, रोहित कोकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रोहित जगताप यांनी केले, सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल धुमाळ यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.