Pune Ajit Pawar - जाती-धर्माचे राजकारण न करता अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी करावी हे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले
कळस येथे स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज,श्री संत ज्ञानेश्वर महाराज,श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून पायाभरणी केल्यामुळेच आज समाजातील सर्व धर्मातील लोक हे गुण्यागोविंदाने राहत आहेत .
त्यामुळे युवा पिढीनेदेखील अशा महान थोर पुरुषांचे स्मरण करून ते आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज यांच्यावर लोकांनी अन्याय केला असला तरी पण त्यांच्या अभंगातूनच आज समाजाला प्रेरणा मिळत आहे.महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी करून स्वराज्याचा झेंडा उंचावण्याचे काम छत्रपतींनी केले आहे.
याबरोबरच समाजाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देऊन विद्येच्या माहेरघरात मुलींकरिता शाळा खुली करण्यात आली. अशा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीपणी केली जाते, अशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यसरकारकडे करण्यात आली आहे. महान थोर पुरुषांनी महाराष्ट्राला जे चांगले विचार दिले आहेत,
ते महाराष्ट्रातील जनता कदापि विसरणार नाही.त्यामुळे समाजातील युवा पिढीने एक दिलाने एक विचाराने महाथोर पुरुषांचे विचार युवा पिढीने पुढे नेण्याचे काम करावे असे आवाहन श्री. पवार यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन आमदार सुनील टिंगरे यांनी केले होते. प्रास्ताविक माझी नगरसेवक सतीश म्हस्के यांनी केले.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,राजेंद्र खांदवे, शीतल सावंत, अहमद शेख,अजय सावंत,अशोक पाटील,सुहास टिंगरे, उषा कळमकर, नाना नलावडे, शशिकांत टिंगरे, माउली कळमकर, बंटी म्हस्के, मीनाक्षी म्हस्के,प्रकाश म्हस्के, बंडू खांदवे,अशोक खांदवे, सायबू चव्हाण, राकेश म्हस्के आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.