Video Viral  esakal
पुणे

Video Viral : इंद्रायणी नदीच्या पुरात दोन कंटेनर आले वाहून; एक पुलाखाली अडकला, व्हिडीओ पाहा

संतोष कानडे

पुणेः दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय. बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पूर आलेले आहेत. आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दूथडी भरुन वाहात आहे.

आळंदीत इंद्रायणी नदीपात्रात दोन कंटेनर वाहून आले होते. हे कंटेनर पुलाला धडकले आणि अडकून पडले. हे दोन कंटेनर नेमके कुठून वाहात आले, याचं कुतूहल बघ्यांना होतं.

इंद्रायणीचा पूर बघण्यासाठी पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. काहींना वाहात आलेल्या कंटेनरचा व्हिडीओ केला. हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्काराला पाचारण करण्यात आलेलं आहे. पुण्याच्या नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीवरुन लष्कराच्या बचाव आणि मदत कार्य पथकाने एकता नगरच्या दिशेने प्रयाण केले आहे. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

लष्करी पथकामध्ये आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा साधने आहेत. डॉक्टर्स, इंजिनिअर्सचा समावेश आहे. याशिवाय लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून वेळ आलीच तर अगदी कमी वेळात ही पथके आवश्यकता असेल तेथे त्वरित पोहोचू शकतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Arjun Tendulkar ची भेदक गोलंदाजी; एकाच सामन्यात ९ विकेट्स घेत संघाला डावाने जिंकवलं; पाहा Video

महामंडळाचा प्रसाद फक्त शिंदे गटाला? हेमंत पाटलांसह संजय शिरसाटांवर नवी जबाबदारी; नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन

SCROLL FOR NEXT