भार्गव विजय राजगुडे  sakal
पुणे

Pune : आंबेगाव तालुक्यातील वडगावपीरच्या सहा वर्षांचा भार्गव राजगुडेचा स्केटिंग मध्ये विश्वविक्रम

विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून प्राप्त

सुदाम बिडकर

पारगाव : आंबेगाव तालुक्यातीच्या पुर्वभागातील वडगावपीर येथील अवघा सहा वर्षांचा चिमुरडा भार्गव विजय राजगुडे याने स्केटिंग क्रीडा प्रकारात राज्य तसेच देश पातळीवरील अनेक स्पर्धात पदके जिंकली आहे.

96 तास सलग स्केटिंग करण्याचा आणि सगळ्यात मोठे अक्षर बनवण्याच्या विश्व विक्रमाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने घेतलीआहे. विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून प्राप्त झालेला भार्गव हा आंबेगाव तालुक्यातील पहिला चिमुरडा ठरला असल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

विजय रामजी राजगुडे व स्वाती राजगुडे यांचा चिरंजीव भार्गव हा पुणे येथील विबाग्योर शाळेत इयत्ता पहिली मध्ये शिकत आहे. विजय राजगुडे हे व्यवसायाने कॉम्पुटर इंजिनीयर असून पुण्यातील मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.

छोट्या भार्गवचा स्केटिंग खेळाकडे असणारा कल ओळखून विजय राजगुडे यांनी त्याला स्केटिंग च्या कोर्सला प्रवेश घेतला.या कोर्स मध्ये ताचे आई वडील पहाटे चार वाजता उठुन त्याला घेऊन जात भार्गवने खूप मेहनत घेऊन त्यात प्राविण्य मिळवले. स्केटिंग व्यतिरिक्त भार्गव ने सांस्कृतिक ढोल वादनमध्ये गणेशोत्सवात पुण्याचा मानाचा कसबा गणपती समोर ढोल वादन सादर केले होते.

काही महिन्यापूर्वी बेळगाव येथे झालेल्या विश्वविक्रममध्ये भार्गव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 96 तास सलग स्केटिंग कारण्याचा आणि सगळ्यात मोठे अक्षर बनवण्याचा विश्वविक्रम 29 मे ते 1 जून 2022 दरम्यान केला होता. त्याचे प्रमाणपत्र त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेकडून नुकतेच प्राप्त झाले आहे. आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी भार्गव याची भेट घेऊन त्याने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

भार्गव ने गेल्या वर्षभरात तीन नॅशनल स्पर्धा (रूरल गेम्स ऑरगनाजशन ऑफ इंडिया, मिशन ऑलम्पिक, इंडुरंस नॅशनल चॅलेंज या राष्ट्रीय स्पर्धा मध्ये सहभागी) जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर पात्रता मध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या आत त्याने पदक जिंकले आहे..

भार्गव ची खेळामधील प्रगती पाहून विबाग्योर शाळेने त्याला वार्षिक खेळामध्ये मशालवाहक होण्याचा मान दिला.

भार्गवचे यश हे अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर प्राप्त झाले आहे.

आपण आपल्या मुलांना त्यांचा कल पाहुन जर चांगले वातावरण , शिक्षण, दिले तर ते कोणत्याही क्षेत्रात निच्छित यशस्वी होतात असा संदेश भार्गव याने मिळवलेल्या यशातुन मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT