पुणे

वळसे-पाटलांचे वर्चस्व राहणार का? आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती?

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

CD

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ

अशी झाली लढत २०१९
विजयी उमेदवार : पक्ष : मिळालेली मते (मताधिक्य)
दिलीप वळसे पाटील : राष्ट्रवादी कॉंग्रेस : १,२६,२२० (६६८७५)

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला. मात्र, पक्षातील फुटीनंतर मतदारसंघावर कुणाचे वर्चस्व राहणार, हे सांगणारी निवडणूक. विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची शांत, संयमी राजकारणी म्हणून असलेली ओळख राष्ट्रवादीच्या बाजूने. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही अनेकजण इच्छुक.


अशी आहे स्थिती :
१. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, बांधकाम व्यावसायिक रमेश येवले हे इच्छुक. येवले यांनी मंचर, घोडेगाव, एकलहरे येथे कार्यालये उभी करून जनसंपर्क मोहीम तीव्र केली आहे. निकम यांनी मंचर येथे कार्यालय सुरू केले आहे.
२. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही प्रभाव असल्याने सुरेश भोर, राजाराम बाणखेले यांच्याकडून उमेदवारीची मागणी.
३. १९९० पासून प्रत्येक निवडणुकीत शिवसेनाच उमेदवार. ५० ते ६० हजार हक्काचे मतदान असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा.
४. काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष राजू इनामदार यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
५. महायुतीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील एकमेव उमेदवार आहेत. ते आठव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.
६. विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात यशस्वी. राज्य सरकारमध्ये दबदबा असलेले कार्यक्षम व अभ्यासू मंत्री म्हणून नावलौकिक.
७. भाजपचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्या उमेदवारीचे समर्थन.

निवडणूक मुद्दे
सातगाव पठार शेती पाणीपुरवठा योजना, म्हाळसाकांत शेती पाणीपुरवठा योजना, डिंभे धरणातून कमलजामाता, बोरघर व फुलवडे सिंचन उपसा, निघोटवाडी पांडवदरा पाझर तलाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT