pune sakal
पुणे

Pune : गाडीतळ चौकाला रिक्षांचा विळखा : इतर वाहतुकीला होतोय अडथळा

केवळ दोनच थांबे दिलेले असतानाही येथील गाडीतळ चौकात तब्बल सात ठिकाणी अनाधिकृतपणे रिक्षा थांबलेल्या असतात

कृष्णकांत कोबल

हडपसर : केवळ दोनच थांबे दिलेले असतानाही येथील गाडीतळ चौकात तब्बल सात ठिकाणी अनाधिकृतपणे रिक्षा थांबलेल्या असतात. त्यामुळे चौकातून जाणारे येणारे सर्व रस्ते अरूंद झालेले आहेत. इतर वाहन चालकांना या अरूंद रस्त्यातून व अडथळ्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सोलापूर रस्त्यावरून प्रवासी घेऊन येणाऱ्या रिक्षा बसथांब्यामागे रस्त्याच्या उजव्या बाजूला थेट रस्त्यावरच थांबतात. पहिली रिक्षा उभी असतानाच दुसरीही तीच्या शेजारी येऊन उभी राहते. तेथून दुसरे प्रवासी मिळेपर्यंत या सर्व रिक्षा जागेवर उभ्या राहत असतात. त्यामुळे इतर वाहनांना मोठा अडथळा होत आहे. पुण्याकडून सासवड व सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील अग्रवाल स्वीटहोम समोर चौकात दोन्ही रस्त्यावर तीन ठिकाणी रिक्षाचालकांनी थांबे बनविले आहेत. त्यांच्या गर्दीत बससह इतर वाहनेही वारंवार अडकून पडत असतात.

येथून पुण्याकडे वळणाऱ्या थेट रस्त्यावररच या रिक्षा ग्राहकांच्या प्रतिक्षेत उभ्या असतात. येथे असलेली सिग्नल क्रॉसिंग लाईन ओलांडूनही त्या उभ्या असतात. त्यामुळे सासवडकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांना सिग्नल मिळूनही अडव्या उभ्या असलेल्या रिक्षांमुळे अडकून पडावे लागते. त्यामुळे येथे वारंवार वाहतूककोंडी होत आहे. याच चौकात सासवडकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरही दोन-दोन लाईनने रिक्षा प्रवाशांच्या प्रतिक्षेत उभ्या असतात. डेपो किंवा थांब्यावरून बाहेर पडणाऱ्या बस येथे वारंवार अडकून पडतात.

रिक्षावाल्यांच्या या मनमानीकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथे रिक्षांची संख्या वाढू लागली आहे. त्यातील अनेकजण प्रवासी मिळविण्याचा स्पर्धेत चौकात वेगाने रिक्षा पळवताना दिसतात. त्यामुळे वारंवार येथे अपघाती परिस्थिती निर्माण होत आहे. त्यासाठी पालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी थांबे निश्चित करून येथील रिक्षाचालकांना शिस्त लावण्याची गरज प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

"गाडीतळ चौकातून कोणत्याही दिशेने गेले तरी रिक्षांचा अडथळा आल्याशिवाय राहत नाही. अनेक रिक्षा शिस्त मोडून वाहतुकीला अडथळा होईल, अशा पध्दतीने उभ्या असतात. त्यामध्ये अनेक तरूण विना परवानाधारक व नवशिके असल्याचे दिसते. त्यांना अडथळ्याबाबत विचारल्यास थेट अंगावर येतात. दुचाकीवर दैनंदिन बाहेर पडणाऱ्या आमच्यासारख्या नोकरदारांमध्ये त्यामुळे भितीचे वातावरण आहे.

दत्तात्रेय पाटील, नोकरदार

"गाडीतळ रस्त्यावर सोलापूर व सासवड रस्ता असे दोनच अधिकृत रिक्षा थांबे दिले आहेत. मात्र, अनेकवेळा चौकाच्या सर्व बाजूला वाहतुकीला अडथळा करीत रिक्षा उभ्या राहत असलेल्या तक्रारी येतात. वारंवार त्यावर कारवाईही केली जात आहे.'

महादेव देसाई वाहतूक पोलीस उपनिरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT