Auto Rickshaw Driver  
पुणे

Pune Viral Video: कारची काच खाली करायला सांगितलं.. लाथा घातल्या; ऑटोरिक्षा चालकाच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

कार्तिक पुजारी

Pune Viral Video: पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. पण, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अशा काही घटना घडत आहेत, त्या पाहून किंवा ऐकून पुणे हे गुन्हेगारांची सिटी आहे असं म्हणता येईल. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पुण्यात हे नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

सदर व्हिडिओमध्ये दिसतंय की, ऑटोरिक्षा ड्रायव्हर दादागिरी करतोय. कार आणि कार चालकावर हल्ला करतो. धमकावतो. सरद व्हिडिओ @punepulse वरून शेअर करण्यात आला आहे. घटना २७ सप्टेंबरच्या सायंकाळची असल्याचं कळतंय. औंध मिलिटरी स्टेशनच्या गेट बाहेर रक्षक चौकाजवळ हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं.

मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक हा आपल्या पत्नीला घेण्यासाठी पुनावळे ते खराडीकडे निघाला होता. यावेळी त्याने औंध रोडवर ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या ऑटोचालकाने अरेरावीची भाषा सुरु केली. ऑटोरिक्षा चालकाने कारवर हल्ला चढवला. कार चालकाला कारची काच खाली घेण्यास सांगितलं आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी कार चालकाने सांगवी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार केली आहे. पण, याप्रकरणी ऑटोरिक्षा चालकावर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. रस्त्यावरून प्रवास करताना प्रत्येकाला अशा प्रकारचा अनुभव येत असतो. पण, काहीजण दादागिरी करताना संपूर्ण मर्यादा ओलांडतात. यांना कशाचीच भीती राहिली नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो.

सदर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय या व्हिडिओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. अनेकजण आपल्याला आलेला अनुभव शेअर करत आहेत. काहींनी ऑटोरिक्षा चालकाच्या मुजोरीबाबत भाष्य केलं आहे. ऑटोरिक्षा चालकांची दादागिरी प्रचंड वाढली आहे. त्यांना पोलिसांची देखील भीती वाटत नाही,असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू; काँग्रेस,‘आप’सह विरोधी पक्षांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

CIDCO Lottery: नवी मुंबईत सिडकोच्या 26 हजार घरांची 'या' तारखेला निघणार लॉटरी; बोर्ड मिटींगमध्ये ठरला मुहूर्त

Pune : कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज यांच्याविरोधात आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Laxman Hake : हाके यांच्यावरील गैरप्रकाराचा निषेध दोषींवर कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT