भुसार बाजारातील गणेश मंदिर ते जय फूड पर्यंतच्या रस्त्यावर ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले आहे. परंतु उखडलेल्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे.
पुणे - भुसार बाजारातील गणेश मंदिर ते जय फूड पर्यंतच्या रस्त्यावर ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले आहे. परंतु उखडलेल्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या ठिकाणी कचरा, चिखल आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहक, व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
समितीने तब्बल साडेबारा ते चौदा कोटी रुपये खर्च करून बाजारात अनेक ठिकाणी नवीन रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. परंतु या रस्त्यावर पुन्हा अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तसेच बाजारात जागोजागी राडारोडा पडलेला आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज खचलेले आहेत. त्यामुळे अपघाताची देखील शक्यता आहे.
मागील चार महिन्यांपासून या खराब रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे. तसेच इतक्या छोट्या कामाला चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी निघून गेला तरी बाजार समितीकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इथे आल्यानंतर मार्केट यार्डात आलो की चिखल यार्डात आलो असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नसल्याचे एका ज्येष्ठ व्यापाऱ्याने सांगितले. याबाबत बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
कचरा आणि दुर्गंधीचा त्रास
बाजार समितीने मार्केट यार्डातील सर्व अडत्यांना परिपत्रक काढत ओला-सुक्या कचऱ्यासाठी बकेट ठेवण्याचे अनिवार्य केले आहे. परंतु अडत्यांनी बाजार समितीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. बाजारात कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने व्यापारी मिळेल तिथे कचरा टाकत आहेत. त्यामुळे सगळीकडे अस्वच्छता पसरत आहे. तसेच कचऱ्यात जनावरे, डुकरे फिरताना दिसत आहेत. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहक, व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.