दत्तनगर : कोरोनाची चाचणी सक्रिय आल्यानंतर सर्वसामान्य नागरिक घाबरून जातात. परंतु, दत्तनगर येथील आनंद दरबारचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी एक वेगळा उपक्रम राबविला. स्वतः कोरोना सक्रिय झाल्यानंतर विलगीकरणातील तिसऱ्या दिवसापासून बाळासाहेबांच्या मनात एक इच्छा घर करून बसली. आणि बाळासाहेब ती इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडू लागले. फोनाफोनी सुरू झाली. विलगीकरणात असताना त्यांचे उपद्व्याप पाहून पत्नी व मुलगाही अचंबित झाले. समाजकार्य करायची वेळ असते पण स्वतःच्या जीवाला बरं वाटत नसतानाही समाजकार्याचे बाळकडू प्यालेले बाळासाहेब थांबणारे नव्हते. आपल्याकडे असणाऱ्या आनंददरबार या वास्तूचा सदुपयोग व्हायला हवे आणि हीच ती वेळ असे बाळासाहेबांच्या मनात घर करून बसलेली हीच संकल्पना होती. आनंद दरबार ही जैन बांधवांची पवित्र व धार्मिक वास्तू आहे. या वास्तूचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आहेत.याठिकाणी त्यांनी फक्त जैन धर्मीयांसाठीच नव्हे तर जैनेत्तरांसाठीही कोविड केअर सेंटर उपयुक्त ठरेल अशी भावना मनात ठेवली.
पाच सहा हॉस्पिटल्स सोबत फोनवरूनच मिटिंग करण्यात आल्या. पैकी भरती विद्यापीठ येथील ऑरा मल्टीस्पेशालिटीचे डॉ.बालाजी कल्याणी, डॉ. मांगडे, डॉ. रवींद्र, डॉ. अर्चना शहा, यांनी बाळासाहेबांच्या या विचाराला सक्रिय प्रतिसाद दिला. आणि पूर्णतः बरे होताच बाळासाहेबांनी पाच सहा दिवसात कोविड सेंटर सुरु करण्याचा चंग बांधला. आणि आपल्या आनंद दरबारातील सभागृह सेंटरसाठी सज्ज करून दिले.त्यांनतर पुणे महानगरपालिकेच्या नियमानुसार आनंद दरबारमध्ये ५० बेडचे कोविड सेंटर उदघाटनाचा थाटमाट न करता, कसलाही गाजावाजा न करता सुरु झाले. आनंद दरबार हे जैनस्थानक असून येथे साधू संतांचे अवागमन होत असते.कोरोना महामारीच्या काळात दरबाराशेजारील मजूर अड्ड्यावरील मजुरांना अन्नदान, पोलीस कर्मचाऱ्यांना अन्नदान, मोफत किराणा वाटप हे बाळासाहेबांनी केलेले आहे. जैनस्थानक असलेल्या धार्मिक वास्तूत कोविड सेंटर होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.
'कोरोना झालेल्या प्रत्येकाने पॉसिटीव्ह विचार केला पाहिजे. प्रशासनाने राज्यातील धार्मिक स्थळे, धर्मशाळा, मंगल कार्यालयांसोबत सुसंवाद साधून कोरोना सेंटर सुरु करता येतील. शिवाय शासनाच्या तिजोरीला व जनसामान्यांच्या खिशाला लागणारी कात्री कमी होऊ शकते. शासनाच्या वेळेची बचतही होऊ शकेल. शिवाय या कठीण काळात सामाजिक कार्याचा वसा सगळ्या धर्मगुरू,सामाजिक संस्था, समाजसेवकांनी घ्यायला हवा.महाराष्ट्रात एक नवीन पायंडा या निमित्ताने पडू शकेल. आणि पुणे तिथे काय उणे ही उक्ती आपणास लागू पडेल. असे बाळासाहेब धोका सकाळशी बोलताना म्हणाले.
आनंद दरबार कोविड केअर सेंटर मधील उपल्बध सुविधा :
१)ऑक्सिजन बेड.
२)आयसोलेशन बेड.
३)पॅथॉलॉजी.
४)एक्सरे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.