Balgandharva Rangmandir and Prashant Damle sakal
पुणे

Balgandharva Rangmandir : बालगंधर्व नाट्यगृह पाडण्यापुर्वी त्याचे काम मुदतीत पुर्ण करण्याची हमी देणार का?

अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतेच नाट्यक्षेत्रात 12 हजार 500 प्रयोग करण्याचा विक्रम केला आहे. त्यानिमित्त दामले यांच्याशी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बालगंधर्व रंगमंदिरासारखी वास्तु पाडण्या न पाडण्यासंदर्भात चर्चा पुर्वी देखील झाल्या आहेत. मुळात पुण्यात आहेत, ती नाट्यगृहे व्यवस्थित ठेवली जात नाहीत. कोथरुडमध्ये 8 वर्षांपासून सुरु असलेले "मिनी थिएटर'चे काम अजूनही पुर्ण झाले नाही. नवे नाट्यगृह बांधायचे म्हणजे त्याला 14 वर्ष लावले जातील. बालगंधर्व नाट्यगृह पाडण्यापुर्वी आम्हाला त्याचे काम मुदतीत पुर्ण करुन पहिला प्रयोगाच्या तारखेची लेखी हमी देणार का? असा प्रश्‍न ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी प्रशांत दामले यांनी गुरुवारी उपस्थित केला.

अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतेच नाट्यक्षेत्रात 12 हजार 500 प्रयोग करण्याचा विक्रम केला आहे. त्यानिमित्त दामले यांच्याशी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दामले यांचा पुणे श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील बापट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे सरचिटणीस पांडुरंग सरोदे, खजिनदार अभिजीत बारभाई उपस्थित होते. दामले यांनी त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास, रंगभुमी, नाट्यलेखन, त्यातील बदल अशा विविध विषयांवर मनसोक्तपणे गप्पा मारल्या.

'नाटकात काम करणे हे माझे पॅशन आहे, 12 हजार 500 प्रयोग करणे हे एकट्याचे काम नाही. तर ते उत्तम "टिमवर्क'चे काम आहे. आत्तापर्यंत माझी 32 नाटके झाली असून ते केवळ "टिमवर्क'मुळेच शक्‍य झाली आहेत. नाटकाच्या प्रत्येक प्रयोगामध्ये नाविन्यता असते. हिंदी चित्रपटदृष्टीतुन कामाच्या ऑफर होत्या, पण मराठीत केलेल्या कामाचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा होता. मराठी रंगभुमीनेच मला भरभरुन दिले आहे. जास्त काम केले, तर इथेही जास्त पैसे मिळतात. लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांची भट्टी जमली आहे. त्यामुळे तिकडे जाण्याची कधी गरज भासली नाही, 'असेही दामले यांनी सांगितले.

लेखनाबाबत दामले म्हणाले, 'दर्जेदार नाट्यलेखन हा नाटकाचा पाया असतो. परंतु, उठला आणि लेखन करु लागलो, असे कधी होत नाही. मराठीमध्ये सध्या 4 ते 5 लेखक चांगल्या ताकदीचे आहेत. चांगल्या लेखनावर दिग्दर्शकाला लेखकाने चांगले नाटक लिहीले, तर त्यावर दिग्दर्शक, कलाकारांना संस्कार करतात येतात. व्यावसायिक नाटक लिहीणे साधी गोष्ट नाही. सगळ्या गोष्टींचा विचार व्यावसायिक नाटक लिहीणाऱ्याला करावा लागतो. मराठी नाटकामध्ये उमेश कामत व संकर्षण कऱ्हाडे हे दोन कलाकार सच्चे आहेत, त्यांनी मनावर घेतले, तर दोघेही वेगळ्या उंचीवर जातील. नाटकात "गुड रिऍक्‍टर इज गुड ऍक्‍टर' असे मी समजतो. 22 लोकांनी एकत्र येऊन केलेल्या नाटकात चुका दिसत नाहीत, नाटकही लोकांना आवडते.''

माझ्यावर 50 कुटुंब अवलंबून

ह्दयविकाराचा आजारानंतर मी तब्येतीची काळजी घ्यायला लागलो. कुठल्याही वादात दिसत नाही, कारण मी स्वतः आपल्या बोलण्याबाबत भरपुर तारतम्य बाळगतो. चांगली झोप व निरोगी आरोग्यासाठी सहा महिन्यातुन एकदा शरीरशुद्धीचा प्रयोग करतो.विशेषतः निर्माता म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी असते. 50 लोकांचे कुटुंबाचे रेशन उपलब्ध होईल, तसे काम करावे लागते. कोरोना कालावधीतही हिच जबाबदारी पार पाडली, असेही त्यांनी सांगितले

कंपूशाहीत मला मुळीच रस नाही

कंपुशाहीशी माझा कधी संबंध आला नाही किंवा मी कंपूशाही मानतच नाही. मी माझे काम चांगल्या पद्धतीने करत राहातो. चांगल्या कामावर आपण कायम लक्ष दिले पाहीजे. खरोखरच चांगले काम करणाऱ्या कंपूशाही वगचैरेचा काही फरक पडत नाही. 'ओटीटी' सारखा प्लॅटफॉर्म उत्तम आहे, त्यामुळे हजारो लोकांना काम मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिंदे फडणवीस सरकारकडून कामाला गती

दामले म्हणाले, 'राजकीय, प्रशासकीय लोकांकडून हि नाटक हा शेवटचा पर्याय म्हणून त्याकडे पाहिले जाते. म्हणून त्याला आवाज मिळवून देण्याची गरज आहे. राज्यातील सुमारे पावणे तीन कोटी लोकांना नाटक बघायला आवडते, हे राजकीय लोकांचे मतदार आहेत. त्यामुळे त्यांनी नाट्यगृह सुधारणेला प्राधान्य दिले पाहीजे. राज्यात नाटकाची 92 केंद्र असून त्यापैकी 51 केंद्र सुस्थितीत आहेत. शिंदे फडणवीस सरकारने नाटकांबाबत चांगले निर्णय घेतले. त्यांच्याकडून नाटकांसबंधीच्या कामाला गती दिली जात अहे. राजकारण्यांकडे चांगली विनोदबुद्धी असते, हे विसरता कामा नये''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT