Pune BAR Association  Sakal
पुणे

पुणे बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीसाठी उद्या मतदान

अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. झंजाड व अ‍ॅड. थोरवे यांमध्ये लढत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) वार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १८) सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. (Pune BAR Association Election Updates)

पीबीएच्या अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. हेमंत झंजाड व अ‍ॅड. पांडुरंग थोरवे यांमध्ये थेट लढत होणार आहे. अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सचिव, ऑडिटर पदासाठी देखील मतदान होणार आहे. उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी सहा, सचिवाच्या दोन जागांसाठी चार तर ऑडीटरच्या एका जागेसाठी तीन जण निवडणूक लढवत आहेत. खजिनदार तसेच कार्यकारिणी सदस्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. बोगस मतदान टाळण्यासाठी मतपत्रिकेवर होलोग्राम असणार आहे. तो बनविण्यासाठी सात दिवसांचा अवधी लागतो. त्याची झेरॉक्स होत नाही तसेच बनावटही तयार करता येत नाही. मतदानावेळी वकीलवर्गाने ओळखपत्र जवळ बाळगावे, अशी माहिती प्रमुख निवडणूक अधिकारी अ‍ॅड. अशोक संकपाळ व सहायक निवडणूक अधिकारी अ‍ॅड. मंगेश लेंडघर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT