mahavitaran sakal
पुणे

बारामती : 5300 कोटींच्या थकबाकीने महावितरणचे आर्थिक गणित बिघडले

थकबाकीचा आकडा 5300 कोटींवर गेल्याने महावितरणचे आर्थिक गणित बिघडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

बारामती : महावितरणच्या बारामती परिमंडलाने वीजबिल वसुलीसाठी कठोर मोहीम हाती घेतली असून, सरकारी कार्यालये, घरगुती ग्राहक, शेतीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. थकबाकीचा आकडा 5300 कोटींवर गेल्याने महावितरणचे आर्थिक गणित बिघडले आहे. दारात लाईनमन येण्यापूर्वी आपले वीजबिल भरुन गैरसोय टाळावी असे आवाहन मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी वीजग्राहकांना केले आहे. (Pune District Agro Light Issue)

बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके तसेच सोलापूर व सातारा हे जिल्हे येतात. तब्बल 27 लाख 35 हजार वीज ग्राहकांना सेवा पुरविण्याचे काम बारामती परिमंडल करत आहे. मात्र सधन पट्ट्यालाही थकबाकीचे ग्रहण लागल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडली आहे. कृषी वगळता 1213 कोटींची थकबाकी आहे. तर शेतीपंपाची थकबाकी 8 हजार कोटींच्यावर आहे. मात्र, सध्या राज्य शासनाने आणलेल्या कृषी धोरणामुळे शेतकऱ्यांना सप्टेंबर 2020 च्या थकबाकीवर 50 टक्के माफी मिळत आहे.

या व्यतिरिक्त दंड, व्याजात सुद्धा माफी दिली आहे. सर्व सवलत गृहीत धरली तर 738288 शेतकऱ्यांना आज रोजी फक्त 4078 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. ही सवलत फक्त 31 मार्चपर्यंतच आहे. शेती आणि बिगर शेती थकबाकी मिळून 5300 कोटी रुपये वसुलीचे उद्दीष्ट बारामती परिमंडलापुढे आहे.

मंडलनिहाय थकबाकी पाहता सोलापूर जिल्ह्यातून शेतीचे 2637 व बिगरशेती ग्राहकांचे 616 असे मिळून 3254 कोटी वसूल होणे अपेक्षित आहे. सातारा शेतीचे 336 व बिगरशेतीचे 218 असे 554 कोटी तर बारामती मंडल मधून शेतीचे 1112 कोटी व बिगरशेतीचे 378 असे मिळून 1491 कोटी वसूलीचे होणे क्रमप्राप्त आहे. बारामती परिमंडल म्हणून 5300 कोटींच्या वसुलीसाठी सर्व त्या उपाययोजना करुन झाल्या आहेत.

मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या निर्देशानुसार विभाग, उपविभाग व अगदी शाखानिहाय पथके बनविण्यात आली आहेत. ही सर्व पथके प्रत्यक्ष वसुली मोहीमेत सहभागी होऊन वसूली करणार आहेत. या कामावर मुख्यालयाची बारीक नजर असून, कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. स्वत: संचालक (संचालन) संजय ताकसांडे हे सुद्धा वसुलीसाठी बारामती परिमंडलाचा ‘ऑन द स्पॉट’ आढावा घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT