Bridgestone Mobility Social Impact Awards 2024 sakal
पुणे

पुणे येथील काम फाऊंडेशन आणि क्रांती सामाजिक संस्थाना यंदाचा ब्रिजस्टोन मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट पुरस्कार

Bridgestone Mobility Social Impact Awards 2024 : ‘स्वच्छ परिसरातील शाश्वत रोजगार’ आणि ‘उपेक्षित महिला आणि मुलींचे सक्षमीकरण’ प्रकल्पांसाठी सन्मानित

सकाळ वृत्तसेवा

Pune News: देशातील मानाचा पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणा-या ब्रिजस्टॉन मोबिलीटी सोशल इम्पॅक्ट पुरस्काराने (एमएसआयए) यंदा पुण्यातील दोन नामांकित संस्थांना सन्मानित केले जाईल. काम फाऊंडेशन आणि क्रांती या सामाजिक संस्थांना यंदाचा ब्रिजस्टॉन मोबिलीटी सोशल इम्पॅक्ट पुरस्कार जाहीर झाला आहे.

दोन्ही संस्थांना त्यांच्या अनुक्रमे स्वच्छ परिसरातील शाश्वत रोजगार आणि उपेक्षित महिला आणि मुलींचे सक्षमीकरण या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी दुर्बल घटकातील रोजगाराच्या संधी या वर्गवारीतील पुरस्कार जाहीर झाला आहे.

एमएसआय़ए हा पुरस्कार ब्रिजस्टॉन इंडियाच्यावतीने सुरक्षित आणि शाश्वत रोजगाराच्या संधी या हेतुखातर विविध सामाजिक संस्थांना दिला जातो. समाजातील समस्यांचे निराकरण होण्याकरिता सामाजिक संस्थांचे योगदान ध्यानात घेता तसेच विविध प्रकल्पांच्या माध्यमातून सामाजिक विकास घडवण्यातील त्यांचा सहभाग लक्षात घेत ब्रिजस्टॉन इंडिया एमएसआयए पुरस्काराने संबंधित सामाजिक संस्थांना सन्मानित करते.

या पुरस्काराबद्दल माहिती देताना ब्रिजस्टॉन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. हिरोशी योशीझॅन म्हणाले की, आम्ही सामाजिक विकासात उत्कृष्ठ दर्जाच्या सेवा उपलब्ध असाव्यात हा उदात्त हेतूसाठी विविध उपक्रम राबवतो.

जेणेकरून समाजातील विविध घटकांचा तसेच जनतेचा सर्वांगीण विकास होईल. हा हेतू साध्य होण्यासाठी एमएसआयए पुरस्काराने विविध सामाजिक संस्थांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी गौरविले जाते. यंदाचा हा चौथा एमएसआयए पुरस्कार आहे. समाजातील विविध समुदायांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध सामाजिक संस्था झटत असतात. या संस्थांच्या योगदानाला जाहीर सन्मान मिळावा, याकरिता यंदाच्या चौथ्या एमएसआयए पुरस्कारासाठी योजना करण्यात आली आहे.

पुणे येथील काम फाऊंडेशनला यंदाचा एमएसआयए पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘दुर्बल घटकातील रोजगाराच्या संधी’ या वर्गवारीतील ‘स्वच्छ परिसरातील शाश्वत रोजगार’ हा पुरस्कार मिळाला आहे. या उपक्रमांतर्गत काम फाऊंडेशनने सफाई कामगारांचा व्यावसायिक, आर्थिक आणि सामाजिक दर्जा उंचावण्याकरिता ५० सफाई कामगारांवर लक्ष केंद्रित केले आहे.

हे ५० कर्मचारी विविध उपक्रमांच्या माध्यमातून इतर देखभाल दुरुस्ती कामकाजांतील कर्मचा-यांच्या समान आणि विकसित जीवनमानात आयुष्य जगतील, यासाठी काम फाऊंडेशन प्रयत्नशील आहे.

संस्थेच्या पुढाकारामुळे आता या ५० सफाई कामगारांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. विमा, पीपीई गणवेश, वैद्यकीय सेवा आदींसह मासिक उत्पन्न दोन हजारांवरुन आता वीस हजारापर्यंत वाढले. काम फाऊंडेशनच्या उपक्रमामुळे या कर्मचा-यांवर अवलबून असणा-या १०० कौटुंबिक सदस्यांचेही जीवनमान अप्रत्यक्षरित्या सुधारले.

काम फाऊंडेशनखालोखाल पुणे येथील शिरुरमधील क्रांती ही सामाजिक संस्था पुरस्कारातील उपविजेता ठरली. ‘दुर्बल घटकातील रोजगाराच्या संधी’ या वर्गवारीत क्रांती सामाजिक संस्थेला दुस-या क्रमांकावर गौरवण्यात आले.

‘उपेक्षित महिला व मुलींचे सबलीकरण’ या प्रकल्पासाठी संस्थेला हा पुरस्कार दिला गेला. लिंग भेद आणि जातीय हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या २ हजार ४६० महिला व मुलींच्या उदात्तीकरणासाठी ही संस्था कणखरपणे उभी राहिली आहे.

या पिडीत महिला व मुलींना कायदेशीर मदत पुरवणे, समुपदेशन, घटनेची नोंद, न्यायालयीन प्रक्रिया आणि नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल करणे आदी कामांमध्ये क्रांती संस्थेतील सदस्यांचा सहभाग असतो. संस्थेने ४६० मुलींसह दोन हजार मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला, तर ७ हजार ६९५ लाभार्थ्यांना हक्काची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मदत केली.

पुरस्कारने गौरविलेलेल्या दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांचे आभार व्यक्त केले. काम फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता सिंग यांनी आयोजनकांना धन्यवाद दिले. त्या म्हणाल्या की, यंदाचा ब्रिजस्टॉन मोबिलीटी सोशल इम्पॅक्ट पुरस्काराने काम फाऊंडेशनला दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते.

स्वच्छता कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून अस्वच्छ परिसरातील कचरा साफ करतात. यामुळे कित्येकदा त्यांना जीवघेणा आजारही होतो. दुर्बल घटकांतील स्वच्छता कर्मचा-यांचे जीवनमान उंचावणे हा आमच्या संस्थेचा हेतू आहे.

आम्ही त्यांना मशीन तसेच विविध यंत्रणेच्या मदतीने परिसरातील स्वच्छता कशी राखावी, यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण देतो. त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि सामाजिक विकास वृद्धिंगत व्हावा हे आमचे उद्दिष्ट आहे. शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी आमच्या प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल आणि स्वच्छता कर्मचा-यांसारख्या असुरक्षित समुदायांना सक्षम करण्याच्या आमच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही ब्रिजस्टोनचे आभारी आहोत.

पुरस्कार मिळाल्याबद्दल क्रांती फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुनिता एकनाथ भोसले यांनीही आयोजकांचा धन्यवाद दिले. आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, दुर्बल घटकांच्या विकासासाठी आम्ही करत असलेल्या परिश्रमांची दखल घेतली जाईल अशी मी कल्पनाही केली नव्हती.

आमच्या मेहनतीला यंदाच्या ब्रिजस्टॉन मोबिलीटी सोशल इम्पॅक्ट पुरस्काराने गौरविले गेले. संस्थेची उभारणी झाल्यापासून आजतागायत आम्ही दैनंदिन रोजंदारीच्या कचाट्यातील लोकांचे आयुष्य सुधारावे म्हणून झटत आहोत. आम्हांला उपविजेतेपदाने सन्मानित करण्यात आले आहे. या वंचित समूहाच्या उद्धारासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत राहू, हे वचन देतो आणि हा पुरस्कार स्विकारतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT