पुणे

Pune: बकरीईद निमित्ताने सोमवारी बेल्हे बैल बाजार राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा

AleFata Bazar: सोमवार दि.१७ रोजी बकरी ईद असल्याने,बेल्हे या ठिकाणी भरत असलेला जनावरांचा बाजार बंद राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिस निरीक्षक होडगर म्हणाले की,सोमवारी बकरी ईद सण साजरा केला जाणार आहे.त्यात महाराष्ट्रात प्राणी संरक्षण कायदयानुसार दुध देणाऱ्या गायी,म्हैस,बैल,रेडा,पारडी,वळु अशा गोवंश जनावरांची कत्तल व त्यांचे मांस वाहतुक करण्यास बंदी आहे.

बकरी ईद सणाचे कत्तलसाठी जनावरांची मोठया प्रमाणात सोलापूर रोड,अहमदनगर रोड,सासवड रोड व नाशिक रोडने वाहतूक होऊन सदरच्या वाहतुकीस काही संघटनांकडून विरोध होऊन अटकाव होण्याची आणि त्याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यासाठी बकरी ईदचे दिवशी गोवंश जनावरांची कत्तल रोखण्यासाठी जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील जनावरांचा बाजार(दि.१७)रोजी बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आदेश दिला आहे.

सोमवारी बेल्हे येथील केवळ जनावरांचा बाजार बंद राहणार आहे.या आदेशाची पायमल्ली करून कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्यावर कारवाई केली जाणार असा इशारा पोलिस निरीक्षक होडगर यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT