Pune Sakal
पुणे

Pune : देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र होण्यासाठी प्रयत्न करा ; सुधीर मुनगंटीवार

वन विभागाच्यावतीने चांदणी चौकाजवळील एनडीए रस्त्यावर बावधन वन परिक्षेत्रात बांधलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते

सकाळ वृत्तसेवा

राजेंद्रकृष्ण कापसे

जखमी आणि वेदनेने त्रासलेल्या वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी पुण्यातील बावधन येथे वन्यप्राणी उपचार केंद्रामुळे मोठी सोय झाली आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. मुक्या प्राण्यांसाठी हे उपचार केंद्र देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र असले पाहिजे यासाठी प्रयत्न करावा. असे आवाहन वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वन विभागाच्यावतीने चांदणी चौकाजवळील एनडीए रस्त्यावर बावधन वन परिक्षेत्रात बांधलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, पुणे क्षेत्र प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण, प्रादेशिक उपवनसंरक्षक राहुल पाटील, वनसंरक्षक(कार्य आयोजना) विजय भिसे, वनसंरक्षक हनुमंत धुमाळ, विभागीय वन अधिकारी दक्षता राम धोत्रे, सहायक वन संशोधन पुणे संजय कडू उपस्थित होते.

मुनगुंटीवार यांच्या हस्ते येथे वृक्षारोपण केले. उपचार केंद्रातील विविध सोयी सुविधांची पाहणी करीत माहिती घेतली. वन्यप्राणी उपचार केंद्र उभारणीत योगदानाबद्दल प्रादेशिक उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, वनीकरण आणि इको टुरिझम सहायक उपवनसंरक्षक दीपक पवार, वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, मयूर यादव, विद्याधर गांडीले, सुरेश बरले यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

मुनगंटीवार म्हणाले, निसर्गाने सुंदर सृष्टी निर्माण करताना पक्षी, प्राणी यांच्या संरक्षणाची जबाबदारी मानवाची आहे. मानवाने १८२० पासून ५० टक्के जंगल नष्ट करून वन्यप्राण्यांना उपेक्षित केले आहे.

मग हे वन्य प्राणी शहरात कसे आले. असे आपण म्हणतो. वन्यप्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष बाबतीत वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

वन्यप्राणी उपचार केंद्र

निसर्गरम्य ठिकाणी उपचार केंद्राची स्थापना केली आहे. येथे सुमारे चारशे जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करता येणार आहे. या उपचार केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २८ कोटी रुपये खर्च केला आहे.

दुसऱ्या टप्प्यात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे ३८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही वेळेत पूर्ण होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘जिथे वन, तिथे जीवन'

आपण वन व्यवस्थापनाचा आदर्श जगाला दिला. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत असताना तो राखण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे. 'जिथे वन तिथे जीवन' असल्याने वृक्षारोपणासाठी सर्वांनी योगदान द्यावे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने 'अमृत वन उद्यान' उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यातील दुर्मिळ प्रजाती, प्रमुख वृक्ष औषधी वनस्पती असे ४०० वृक्षांची लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार भीमराव तापकीर यांनी वारजे, तळजाई आणि सिंहगड परिसरातील वन विभागाची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावी.

नागरिकांना सोई- सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात असे सांगितले.प्राण्यांच्या उपचारासाठी केंद्राची आवश्यकता होती. महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे उपचार केंद्र असल्याची माहिती राहुल पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT