भोर (पुणे) : येथील आयडीबीआय बँकेत खोटे सोने तारण ठेवून बँकेची ३८ लाख १८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात भोर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये टापरेवाडी (ता.भोर) येथील तीन सोने-तारण कर्जदार, बँकेच्या पॅनेलवरील एक सोनार आणि एक फेरतपासणी करणारा सोनार आदींचा समावेश आहे. विद्याधर माधवराव टापरे, गणेश भागोजी माजगुडे व विकास संपत सावंत (सर्वजण,रा.टापरेवाडी), नंदकुमार किसन कामळे (रा. भोर) व चेतन अशोक बेलापूरकर (रा. शिरवळ, ता.खंडाळा, जि.सातारा) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः वरील तीनही आरोपींनी २०१७ ते २०२० या कालावधीमध्ये एकूण १ हजार ८६१ ग्रॅम सोने ठेवून बँकेकडून एकूण ३८ लाख १८ हजार ५०० रुपये कर्ज घेतले. यामध्ये विद्याधर टापरे यांनी ८८४.५० ग्रॅम खोटे सोने ठेवून १४ लाख ८८ हजार ५०० रुपये कर्ज घेतले. गणेश भागोजी माजगुडे याने ६९३ ग्रॅम खोटे सोने ठेवून १४ लाख ३० हजार रुपये कर्ज घेतले. आणि विकास संपत सावंत यांने २८४ ग्राम खोटे सोने ठेवून ९ लाख रुपयांचे कर्ज घेतले.
बँकेच्या वतीने नेमलेला सोनार नंदकुमार कामळे यांनी सोने शुध्द असल्याचा अहवाल बँकेला दिला होता. आणि चेतन बेलापूरकर यांनी फेरतपासणी करूनही सोने शुध्द असल्याचा खोटा अहवाल दिला. बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून झालेल्या फेरतपासणीत सोने खोटे असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर बँकेचे शाखाधिकारी कुंदन तिवारी यांनी भोर पोलिसात पाच जणांविरोधात फिर्याद दाखल केली. भोरचे पोलिस उपनिरीक्षक राहूल साबळे पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.