pune sakal
पुणे

Pune news : रस्त्यावर उतरायची वेळ नका आणू; आ.भीमराव तापकीर

गोऱ्हे बुद्रुकच्या कोयता गँग प्रकरणी आमदार भीमराव तापकीरांचा ग्रामीण पोलिसांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : तलवार, कोयता घेऊन गोऱ्हे बुद्रुक येथे दहशत निर्माण करणाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार देणाऱ्या महिलांना हवेली पोलिस ठाण्यात दीड तास बसवून ठेवण्याचा प्रकार घडला. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत या कोयता गँगवर कठोर कारवाई करा. अन्यथा मला व ग्रामस्थांना रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नका.’ असा इशारा आमदार भीमराव तापकीर यांनी ग्रामीण पोलिसांना दिला आहे.

गोऱ्हे बुद्रुक गावात ग्रामपंचायतीच्या संकल्पनेने ‘सीसीटीव्ही कॅमेरां’ च्या लोकार्पण सोहळा आज गुरूवारी ग्रामपंचायत कार्यालयात आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गावात ४५ ‘सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. याचा फायदा गावाच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांच्यावर लक्ष ठेवण्यास मदत होईल.

कार्यक्रमाला पोलिस उपाधीक्षक भाऊसाहेब ढोले, सरपंच शारदा खिरीड, उपसरपंच सविता पवार, ग्रामपंचायत सदस्य सुशांत खिरीड, नरेंद्र ऊर्फ काका खिरीड, जयश्री कुरावले, सुजित तिपोळे, सुजाता नानगुडे, रुपाली जगताप, अर्चना खिरीड, ग्रामसेवक संदीप धोत्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रेय जोरकर, भाजपच्या दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाजीराव पारगे, निवृत्त सुभेदार तुकाराम खिरीड, माजी सैनिक उत्तम करंजावणे, भाजपचे किशोर पोकळे उपस्थित होते.

गोऱ्हे बुद्रुकची ओळख सांप्रदायिक,आजी- माजी सैनिकांचे गाव अशी आहे. गावात चार दिवसापूर्वी ‘गाडी हळू चालवा’ असे सांगितल्याच्या कारणावरून तलवार, कोयता घेऊन दहशत करण्याचा प्रकार घडला होता. याबाबत महिलांची मला तक्रार आल्यानंतर तातडीने पोलिस अधीक्षकांना फोन केला. त्यानंतर, महिलांची तक्रार घेतली.

अशी माहिती देत आमदार तापकीर म्हणाले, यामध्ये पोलिसानी स्वत: तक्रार देत मोठी कारवाई करणे अपेक्षित होते. खडकवासला धरणाच्या लगत, चरस गांजा विक्री होत आहे. खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात खुले आम दारू विक्री होत आहे. याची माहिती उपाधिक्षक भाऊसाहेब ढोले यांना नसेल त्यांच्या हाताखालीच्या हवेली पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची माहिती असेल. असे सांगून अवैध धंदे यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

सरपंच शारदा खिरीड, उपसरपंच सविता पवार, सुरेखा खिरीड, आशा नानगुडे, सुजाता नानगुडे, कविता तनपुरे, अर्चना खिरीड, रुपाली शेलार, राजू नानगुडे, माजी सरपंच अनिल खिरीड यांनी ग्रामस्थांच्या वतीने हवेलीचे पोलिस उपाधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना निवेदन दिले.

कोट तक्रार देणाऱ्या महिलांना पोलिस ठाण्यात दीड तास बसविले ही घटना चुकीचे आहे. गुन्हेगारांना जास्त शिक्षा करण्याचे माझे प्रयत्न असतील. परिसरात चुकीची घटनेबाबत माहिती माझ्या या व्हॉटसअप ८७९६८०११८१ क्रमांकावर द्या. तुमचे नाव गुप्त ठेऊ. काही गुन्ह्यात १८ वर्षाखालील मुले आहेत.

त्यांचावर कारवाई करताना आमच्यावर बंधने आहेत. माझ्या पोलिस सेवेच्या कारकिर्दीत सर्वात जास्त सीसीटीव्ही कॅमेरे या गावाने बसविले आहेत. त्याबद्दल ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे कौतुक केले. सीसीटीव्ही कॅमेरेमुळे मनुष्यबळ वाढले आहे.

-भाऊसाहेब ढोले, हवेलीचे पोलिस उपाधीक्षक

गोऱ्हे बुद्रुक : कोयता गँग प्रकरण, अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ विक्री करणारे, ओढणारे व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने आमदार भीमराव तापकीर हवेलीचे पोलिस उपाधीक्षक भाऊसाहेब ढोले यांना गुरुवारी निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT