An under-construction building collapsed in Yerwada, Pune Sakal Digital
पुणे

Pune Building Collapse: चौघांना १५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी

अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : येरवड्यात एका इमारतीच्या पायात बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यांचा सांगाडा कोसळून झालेल्या अपघातात पाच कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींचा शोध पोलिस घेत असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.(Pune Building Collapse Case)

प्रकल्पाचा वरिष्ठ सुरक्षा सुपरवायझर इम्तियाज अबुल बरकात अन्सारी ( वय ३८, रा. बिहार), कामगार ठेकेदार सुपरवायझर महम्मद शरीफ हबिबूल रहेमान आलम (वय ३५, रा. बिहार), प्रकल्पांचा सहाय्यक व्यवस्थापक विजय एकनाथ धाकतोडे (वय २५, रा. शिक्रापूर) व प्रकल्प व्यवस्थापक मुजीफ इलीसा खान ( वय ४५, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या प्रकरणी बांधकाम मजूर महम्मद नाहीद महम्मद मास्टर (वय २१, सध्या रा. लेबर कॅम्प, गुंजन चित्रपटगृहाजवळ, येरवडा, मूळ रा. बरसोई घाट, जि. कटिहार, बिहार) यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

येरवडामधील शास्त्रीनगरमध्ये असलेल्या गल्ली क्रमांक आठमध्ये ब्ल्यू ग्रास बिझनेस पार्क या नियोजित व्यावसायिक संकुलाचे काम सुरू आहे. इमारतीचा पाया खोदण्याचे काम सध्या सुरू असून त्यावर लोखंडी सळयांपासून करण्यात आलेला मोठा सांगडा बसविण्यात आला आहे. गुरुवारी (ता. ३) रात्री अकराच्या सुमारास लोखंडी सांगड्याखाली दहा मजूर काम करत होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका दिवसात यातील चौघांना अटक केली आहे. त्यांना शनिवारी (ता. ५) न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT