pune chakan traffic police action on auto rickshaw  Sakal
पुणे

Chakan News : चाकणला वाहतूक विभागाची 'बेकायदा' रिक्षावर कारवाई

Chakan traffic police action on auto rickshaw : बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षावर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली. या रिक्षा कालबाह्य झालेल्या आहेत ज्यांचे परवाने संपलेले आहेत.

हरिदास कड

चाकण : येथे बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षावर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली. या रिक्षा कालबाह्य झालेल्या आहेत ज्यांचे परवाने संपलेले आहेत. त्यांची मुदत संपली आहे. जुन्या झाल्या आहेत.तरी त्या रिक्षा बेकायदेशीर रित्या चालविल्या जातात. या रिक्षावर वाहतूक विभागाने कारवाई केली. त्या रिक्षा पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या आहेत.

चाकण,ता. खेड येथील पुणे -नाशिक महामार्ग,चाकण- तळेगाव,चाकण- शिक्रापूर या मार्गावर तसेच आंबेठाण या मार्गावर हजारोंच्या संख्येने रिक्षा सुमारे पाच हजारावर धावतात. या रिक्षा बेदरकारपणे चालक चालवतात.त्यामुळे रिक्षांचे अपघात वारंवार होतात.

अनेक कामगार निष्पाप लोक यात मृत्यूमुखी पडलेले आहेत. परिसरातील पुणे- नाशिक महामार्गावर, चाकण- भोसरी, चाकण- राजगुरुनगर, चाकण -तळेगाव, चाकण- शिक्रापूर, चाकण- आंबेठाण या मार्गावर मोठ्या प्रमाणात रिक्षा धावतात तसेच औद्योगिक वसाहतीतही रिक्षा धावतात.

सुमारे पाच हजार तीन चाकी रिक्षा या परिसरात धावत असतात.अगदी सेकंदाला रिक्षा धावतात.चाकण परिसरातील चौकात या रिक्षांचे बेकायदा वाहनतळ आहेत. यांच्या अडथळ्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो.या रिक्षावर कारवाई करावी या रिक्षा बंद कराव्यात अशी मागणी नागरिकांची आहे. या रिक्षा बंद होत नाहीत.

बेकायदा, परवाने नसलेल्या परजिल्ह्यातून बेकायदा रिक्षा चाकण परिसरात आलेल्या आहेत.ज्या रिक्षा प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करून जप्त केल्या पाहिजेत अशा अनेक रिक्षा या मार्गावर धावतात. या रिक्षा कोण भाड्यावर चालवतो तर कोण स्वतः चालवतो.

अनेक रिक्षा काही लोकांनी घेतलेल्या असून त्या भाड्यावर चालविल्या जातात चालकाला दिवसाचे पैसे दिले जातात. शिफ्टचे पैसे दिले जातात आणि रिक्षा चालवतात.रिक्षा व्यवसायात काही नेते, कार्यकर्ते, गुन्हेगार, काही संघटनेचे लोक अगदी पोलीस सुद्धा गुंतलेले आहेत.

या रिक्षावर अनेक नावे दिलेली असतात त्यातूनही कळते की हा रिक्षाचालक कोणाचे समर्थन करतो. पर जिल्ह्यातून अनेक रिक्षा येथे आलेल्या आहेत. त्या बेकायदा आहेत त्यांना परवानगी ही नाही. परवाने नाहीत अशाही रिक्षा या मार्गावर मोठ्या प्रमाणात धावतात. लाखो रुपये येथे हप्त्यातून गोळा केले जातात असाही आरोप आहे.

लाखो रुपये कोण गोळा करते. कोणाकडे मलिदा जातो याची चौकशी होणे गरजेचे आहे अशी नागरिकांची मागणी आहे. रिक्षाचालकांकडून हप्ता गोळा करणारे पोलिसांचे हस्तक झाले आहेत असेही बोलले जाते.

येथील तळेगाव चौकातील, आंबेठाण चौकातील, माणिक चौकातील रिक्षा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त उभ्या राहतात त्यामुळे इतर वाहनांना अडथळा होतो. हे रिक्षाचालक दादागिरी करतात मार्गाने ये- जा करणाऱ्या लोकांना शिवीगाळ, दमदाटी,धक्काबुक्की करतात असे अनेक प्रकार घडतात. रिक्षा चालकांच्या मागे कोणीतरी मास्टरमाइंड असतो त्यामुळे त्यांची दादागिरी सतत चालू असते असे बोलले जाते.

चाकण औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर खाजगी बसेस धावतात. बसेस कंपन्यांना पुरवणारे अनेक ठेकेदार आहेत. कंपनीच्या कामगारांना ने आण करण्यासाठी तसेच कंपन्यांचे अधिकारी,कर्मचारी यांना ने आण करण्यासाठी वापरल्या जातात. कंपन्या सुटल्यानंतर तसेच कंपन्या सुरू होण्यापूर्वी या बस मोठ्या प्रमाणात मार्गावर दिसतात.

बसच्या व्यवसायातून लाखो रुपये कमावणारे येथे आहेत. या बस वर सबंधितांची नावे संबंधित कंपनीची तसेच ग्रुपची नावे लिहिलेली आहेत. या बसही अस्ताव्यस्त पणे लावल्या जातात.मार्गाने भरधाव वेगात चालवल्या जातात.

येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांना वाहन चालकांना बसचे चालक दादागिरी करतात. या बसचे ठेकेदार स्थानिक असल्याने बस चालकांची दादागिरी मोठी आहे . या बसमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते असेही नागरिकांचे म्हणणे आहे.अशा चालकांना समज देऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे आवश्यक आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

चाकण वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी सांगितले की, " बेकायदा परवाना नसलेल्या व कालबाह्य झालेल्या रिक्षावर दंडात्मक कारवाई करून अगदी चार हजार रुपये दंड करून आम्ही त्या रिक्षा पोलीस ठाण्यात नेत आहोत. अनेक रिक्षा चालकांकडे परवाने नाहीत.कागदपत्रे नाहीत प्रादेशिक परिवहन विभागाने या रिक्षा जप्त केल्या पाहिजेत. पण त्यांची कारवाई होत नाही."

"सकाळ "ने बेकायदा रिक्षा बाबत तसेच रिक्षा चालकांच्या समस्येबाबत त्यांच्याशी बोलून छायाचित्रा सह बातमी प्रसिद्ध केली होती.बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काही रिक्षाचालक आमदार दिलीप मोहिते यांच्याकडे गेले. रिक्षा चालकांनी त्यांच्या व्यथा तिथे मांडल्या. रिक्षाना वाहनतळ नाही त्या वाहन तळाची मागणी त्यांनी आमदारांकडे केली.

आमदार दिलीप मोहिते यांनी वाहतक विभागाचे संबंधित पोलिस अधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क केला.आमदार मोहिते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रिक्षा चालकांकडून हप्ता गोळा केला जातो असेही सुनावले. याबाबत मी आयुक्तांना सांगणार आहे असे सांगितले. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनाही या रिक्षा समस्यांची माहिती दिली.

पण परिसरात मोठ्या प्रमाणात रिक्षांची संख्या वाढत आहे त्या हजारोंच्या संख्येत आहे त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो . परिवहन विभागाने रिक्षाचे परमिट देणे सुरू केले आहे त्यामुळे रिक्षांची संख्या वाढत आहे हे परमिट देणे बंद करावे असे आमदार मोहिते यांनी संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना फोनवरून सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT