समाधान काटे
पुणे - सोमेश्वर फाउंडेशन आयोजित 'पुणे आयडॉल' स्पर्धेची अंतिम फेरी रविवार (ता.१४) मे बालगंधर्व रंगमंदिर येथे जल्लोषात पार पडली. स्पर्धेचे हे वीसावे वर्ष होते. सहा दिवस चाललेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ८१६ कलाकारांनी सहभाग घेतला होता.
कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांनी स्पर्धेची सुरुवात केली होती.
एकूण चार विभागात घेतलेल्या स्पर्धेत, 'लिटिल चॅम्प' प्रथम श्रेया गाढवे, द्वितीय तनय नाझीरकर. 'ओल्ड इज गोल्ड' प्रथम अब्दुल रजाक बेगमपल्ली, द्वितीय शशिकला वाखारे. 'जनरल कॅटेगरी' प्रथम पल्लवी पाठक, द्वितीय डॉ. तेजस गोखले.
'युवा आयडॉल' प्रथम समृद्धी पटेकर, द्वितीय संदीप दुबे हे 'पुणे आयडॉल' २०२३ विजेते ठरले. विजेत्यांना रोख रक्कम पंधरा हजार, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर 'उत्तेजनार्थ' श्लोक जावीर, प्राजक्ता माने यांना प्रत्येकी रोख रक्कम पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
रविवारी झालेल्या अंतिम स्पर्धेत संगीत, सूर, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, गायक अभिजीत कोसंबी, जितेंद्र भुरूक, स्वाती निम्हण, बाळासाहेब बोडके, मुकारी अलगुडे, अमित गावडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, गणेश घुले, नितीन दांगट, सुनील काशीद -पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. प्रास्ताविक आयोजक सनी निम्हण यांनी केले,
तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी व प्रवीण पोतदार यांनी केले. स्वागत उमेश वाघ, अमित मुरकुटे यांनी केले व आभार बिपीन मोदी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनमाला कांबळे, किरण पाटील, रमेश भंडारी, तुषार भिसे अभिषेक परदेशी, कासिम तुर्क, नितेश दास, संजय माझिरे आदींनी परिश्रम घेतले.
"गायक, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. या अनुषंगाने चालू केलेल्या स्पर्धेला नागरिकांचा आणि कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संयोजक आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ही स्पर्धा पुढेही सातत्याने चालू राहील. सर्व समावेशक स्पर्धा असल्याने राज्यभरातील कलाकार यामध्ये सहभागी होऊ लागले आहेत."
- सनी निम्हण आयोजक
"पहिल्या दिवसापासून खूप चुरशीची स्पर्धा होती. अतिशय छान गाणाऱ्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अंतिम फेरी देखील खूप रंगली होती, स्पर्धेत भाग घेण्यासाठी मंच दिला याबद्दल आभारी आहे".
- समृद्धी पटेकर 'युवा आयडॉल' प्रथम विजेती
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.