Pune plastic bottle sakal
पुणे

Pune News : पुणेकरांनी केले साडे सात टन बाटल्यांचे संकलन

महापालिकेच्या प्लास्टिकच्या बाटल्या जमा करण्याच्या उपक्रमामध्ये पुणेकरांनी आत्तापर्यंत १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ७ टन ६८ किलो प्लास्टिक बाटल्या जमा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या प्लास्टिकच्या बाटल्या जमा करण्याच्या उपक्रमामध्ये पुणेकरांनी आत्तापर्यंत १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ७ टन ६८ किलो प्लास्टिक बाटल्या जमा झाल्या आहेत. नागरिकांची वाढता प्रतिसाद बघता या उपक्रमाची मुदत २ एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे. सर्वात जास्त धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्लास्टिक बॉटलचे संकलन झाले आहे.

पुणे महापालिकेने ‘प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धे’चे आयोजन केले आहे. यामध्ये कमिन्स इंडिया या संस्थेच्या सहकार्याने या स्पर्धेतील विजेत्यांना इलेक्ट्रिक बाईक, स्मार्टफोन, स्मार्टवॉच असे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी १५ मार्च अखेरची मुदत होती पण आता ही मुदत २ एप्रिल पर्यंत देण्यात आली आहे.

महापालिकेने अधिकृत केलेल्या रिसायकलर्स किंवा प्रोसेसर्सकडे संकलित झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्या देऊन त्यापासून आकर्षक म्युरल्स, पेव्हर ब्लॉक्स, इंटरलॉकिंग ब्लॉक्स आदी साहित्य बनवून शहरातील रस्ते, उद्यानात ते ठेवून सुशोभीकरण केले जाणार आहे.

या उपक्रमात आत्तापर्यंत १ हजार १५३ जणांनी वैयक्तीक पातळीवर सहभाग घेऊन ४ हजार ४८९ किलो बाटल्या जमा केल्या आहेत. ९१ शैक्षणिक संस्थांनी १ हजार ८०८ किलो तर, १४७ सोसायट्यांनी १ हजार ३७९ किलो बाटल्या जमा केल्या. या तीन गटात मिळून एकूण ७ टन ६८ किलो बाटल्या जमा झाल्या आहेत. यात सर्वाधिक धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात ७९२ किलो, हडपसरला ७५९ किलो, तर कोथरूड - बावधनला ५६५ किलो बाटल्या जमा झाल्या आहेत, अशी माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

...तर ॲडमिनवरही दाखल होईल गुन्हा! सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ९९ जणांवर कारवाई; सायबर पोलिसांनी हटविल्या ३० पोस्ट; १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT