pune city Flex Sakal
पुणे

Flex Crime : पुणे शहरातील फ्लेक्स्बाजीवर कारवाई न करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना दंड

पुणे शहरातील फ्लेक्सबाजी थांबावी याकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेच्या परिमंडळ दोन मधील तीन सहाय्यक आयुक्तांना नोटीस बजावून दंडाची शिक्षा केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील फ्लेक्सबाजी थांबावी याकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेच्या परिमंडळ दोन मधील तीन सहाय्यक आयुक्तांना नोटीस बजावून दंडाची शिक्षा केली आहे. त्यानंतर आता परिमंडळ चार मधील क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांवरही कारवाईचा प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहिती आकाश चिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

पुणे शहरातील प्रत्येक चौकात, रस्त्यावर राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, व्यावसायिकांमार्फत मोठमोठे फ्लेक्स लावले जात आहे. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. शहरात १५ ते १७ जानेवारी या कालावधीत ‘जी २०’ परिषदेच्या बैठका होणार आहेत. यावेळी देश विदेशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने शहर स्वच्छतेसाठी विशेष लक्ष दिले जात आहे.

यापूर्वीच सर्व क्षेत्री कार्यालयांना आपल्या हद्दीत बेकायदा फ्लेक्स, होर्डिंग, बॅनर, झेंडे लावले जाऊ नयेत. लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करा असे आदेश खुद्द महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला होता. पण सहाय्यक आयुक्तांनी फ्लेक्स विरोधात कारवाई करू असे आश्‍वासन दिल्याने ही कारवाई टळली होती. पण त्यानंतरही सुधारणा न झाल्याने कारवाई करण्यात आली आहे.

उपायुक्त जगताप म्हणाले, ‘फ्लेक्सवर कारवाई न केल्याने परिमंडळ दोन मधील शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय, आणि कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना नोटीस बजावून दंडाची शिक्षा केली आहे. त्याचप्रमाणे पुढील टप्प्यात परिमंडळ चारमधील वानवडी रामटेकडी, हडपसर मुंढवा आणि कोंढवा येवलेवाडी येथील सहाय्यक आयुक्तांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी बेकायदा होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर, बोर्ड, पोस्टर याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता नागरिकांनाच तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी १८००२३३६६७९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT