Hotel Sakal
पुणे

खवय्यांसाठी खुशखबर! आता हॉटेलात बसून मारा जेवणावर ताव

केवळ पार्सल पुरते मर्यादित असलेले हॉटेल आता सोमवारपासून (ता. ७) प्रत्यक्ष जेवणासाठी खुली होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केवळ पार्सल पुरते मर्यादित असलेले हॉटेल (Hotel) आता सोमवारपासून (Monday) (ता. ७) प्रत्यक्ष जेवणासाठी (Food) खुली (Open) होणार आहेत. त्यामुळे पुणेकर खवय्यांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांवर हॉटेलात बसून ताव मारता येणार आहे. तर हॉटेल सुरू करण्यास परवानगी (Permission) मिळाल्याने व्यवसायिकांना देखील दिलासा मिळाला आहे. (Pune City Hotel Open on Monday After Lockdown)

शहरातील हॉटेल सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत ५० टक्के क्षमेतेने सुरू करण्यास महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवार केवळ पार्सल सेवा सुरू असेल. गेल्या वर्षीचा लॉकडाऊन आणि यंदाचे कडक निर्बंध यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठी आर्थिक झळ बसली आहे. गेल्या वर्षी सुमारे नऊ महिने व यावर्षी दीड महिन्यांहून अधिक काळ हॉटेल बंद होती. त्यामुळे या काळात असलेला व्यवसाय अगदी १० ते २० टक्क्यांवर येऊन थांबला होता. पार्लसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अनेकांनी सुरू केलेली हॉटेल पुन्हा बंद केली होती. गेल्या दीड वर्षांत सुमारे २० टक्के हॉटेल कायमची बंद पडली आहेत. तर व्यवसाय होत नसल्याने हॉटेलचे भाडे, कामगारांचे पगार व इतर सर्व खर्च भागवायचे असा प्रश्‍न व्यावसायिकांना पडला होता. मात्र आता पुन्हा हॉटेल सुरू करण्यात परवानगी दिल्याने व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कामगारांची जुळवाजुळव सुरू होणार :

कोरोनाची भीती आणि रोजगार नसल्याने हॉटेल क्षेत्रात काम करणारे अनेक कामगार त्यांच्या मुळ गावी गेले आहेत. त्यातील अनेक कामगार हे परराज्यातील आहेत. त्यामुळे हॉटेल सुरू करायचे असेल तर त्यांना आधी पुण्यात आणणे गरजेचे आहे. मात्र शहरात येण्यासाठी रेल्वे गाड्या देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे कामगारांची जुळवाजुळव कशी करायची असा प्रश्‍न व्यवसायिकांना पडला आहे.

हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र आमचा ७० ते ८० टक्के व्यवसाय हा संध्याकाळी आणि रात्री होतो. चार वाजताच हॉटेल बंद झाले तर पुरेसा व्यवसाय होणार नाही. त्यामुळे रात्री देखील हॉटेल सुरू करण्यास परवागनी द्यावी.

- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT