लोणी काळभोर : पुणे शहर पोलीस दलात कर्तव्यास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हदीतील कवडीमाळवाडी परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. सुनील नारायण शिंदे (वय- ४८, रा. कवडीमाळवाडी, कदमवाकवस्ती, ता. हवेली) बक्कल नंबर ६५७६ असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पुणे पोलीस आयुक्तालयातील शिमला पोलीस ठाण्यात कर्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील शिंदे हे बुधवारी संध्याकाळी घरातील एका खोलीत झोपले होते. गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वडील उठले का नाहीत यासाठी आवाज दिला. मात्र खोलीमधून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. यावेळी खिडकीतून पाहिले असता त्यांना सुनील शिंदे यांनी खोलीतील पंख्याला खिडकीच्या पडद्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल घोडके, व पोलीस हवालदार तेज भोसले पोहचले असून पुढील कारवाई सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.