Pune sakal
पुणे

Pune - बंद असलेल्या भाजी मार्केटची होतेय कचराकुंडी?

यामुळे सुशोभीकरण व डागडूजीचा खर्चही वाया गेला आहे.

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

Pune - जुनी सांगवी येथील महापालिकेची मध्यवर्ती भागात बंद असलेले स्व.राजीव गांधी भाजी मार्केट मंडईत कचरा पडत असल्याने दुर्लक्षामुळे या भाजी मार्केटची कचराकुंडी होत आहे.

गेली अनेक वर्षांपासून जुनी सांगवी येथील ७६ गाळे असलेली स्व.राजीव गांधी भाजी मार्केट धूळखात पडून आहे.गेली दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या वतीने येथील सुशोभीकरण करून भाजी मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता.

मात्र विक्रेते संख्या जास्त व त्याप्रमाणात गाळे कमी, फेरीवाल्यांकडून होणारी भाजी विक्री, पालिकेचे न परवडणारे भाडे,छोटे बंदिस्त गाळे अशी कारणे देत काही दिवसातच या भाजी मार्केटकडे भाजी विक्रेत्यांनी पाठ फिरवली.यामुळे पालिका व तत्कालीन लोकप्रतिनिधींचा हे भाजी मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न सपशेल फसला.

यामुळे सुशोभीकरण व डागडूजीचा खर्चही वाया गेला आहे.सद्यस्थितीत परिसरात अस्वच्छता,कच-याचे ढीग,आरोग्य विभागाच्या छोट्या कचराकुंड्या,लोखंडी साहित्य, स्वच्छता गृहाची दुरवस्था, पाण्याच्या टाकीतून गळणारे पाणी, यामुळे या बंद असलेल्या भाजी मार्केटला बकालपणा आला आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने भाजी मार्केटची कचराकुंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

स्वच्छता नसल्याने स्वच्छता गृहाची दुरवस्था - भाजी मार्केट मधील स्वच्छता गृहाची नियमित स्वच्छता होत नसल्याने या परिसरात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.यालगत पालिकेचे स्व.इंदिरा गांधी प्रसुतीगृह रूग्णालय आहे.येथील अस्वच्छतेचा त्रास रूग्णालयात येणा-या नागरिक,रुग्ण व कर्मचा-यांना सहन करावा लागत आहे.

मोकळ्या मैदानावर भाजी मार्केट- बंद असलेल्या भाजी मार्केट शेजारी दोन पावलावर असलेल्या मोकळ्या मैदानावर सध्या भाजी विक्रेते भाजी विक्री करतात.मात्र दोन पावलांवर असलेले भाजी मार्केट धूळखात पडून असल्याने महापालिकेचा भाडेरूपी मिळकत उत्पन्न बुडत असल्याने असा दुराभास का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. सध्या स्व.इंदिरा गांधी प्रसुतीगृह रूग्णालयाची इमारत सांगवीकर व परिसरातील नागरिकांसाठी अपुरी पडत आहे.यामुळे धुळखात.

बंद पडून असलेल्या भाजी मार्केटच्या जागेत स्व.इंदिरा गांधी रूग्णालयाचे विस्तारिकरण करा असा मतप्रवाह ही नागरिकांमधून बोलला जात आहे.यामुळे किमान सुसज्ज रुग्णालय वैद्यकीय साधने उपलब्ध होऊन सांगवीकर व परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध होईल.

आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे कचरा साठला जात आहे.यामुळे अस्वच्छता व डास किटकांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरत आहेत. जवळच रुग्णालय,शाळा, मंदिर असल्याने हा परिसर किमान स्वच्छ ठेवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

भाजी मंडईची जागा व रुग्णालयाची जागा एकत्र करून भाजी मंडई व रुग्णालय प्रशस्त व भव्य होऊ शकते, ही मागणी अनेक वर्षांपूर्वीच मी केलेली आहे. नागरिकांचे कररुपी लाखो रुपये खर्च करून भाजी मंडईचे उद्घाटन करून देखील ती पुन्हा बंद पडल्याने परिसराच्या आरोग्य व सौंदर्याला बाधा पोचत आहे.

प्रशांत शितोळे माजी नगरसेवक

येथील भाजी विक्रेते, नागरिक व लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून चर्चेतून यातून मार्ग काढला जाईल.येथील स्वच्छता व देखभाली बाबत सुचना करण्यात आल्या आहेत.

उमेश ढाकणे ह क्षेत्रिय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT