Pune Sakal
पुणे

Pune : सरकारमध्ये आल्याने रखडलेल्या कामांना मिळेल गती ; आमदार टिंगरे

सुमारे २ कोटी ४ लक्ष रुपयांच्या या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार टिंगरे यांच्या हस्ते झाले.

कृष्णकांत कोबल

मांजरी खुर्द - वर्षभरापूर्वी आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर येथील वाघोली व कोलवडी रस्त्याचे काम रखडले होते. मात्र, आता आम्ही सरकारमध्ये सामील झालो असून या कामांना गती मिळेल, असे स्पष्टीकरण आमदार सुनील टिंगरे यांनी दिले.

मांजरी खुर्द (ता. हवेली) गावातील विविध विकास कामांसाठी खासदार व आमदार निधी, ग्रामनिधी, १५ वा वित्त आयोग व जन सुविधा असे विविध निधी मंजूर झाले आहेत. त्यातून रस्ते, ड्रेनेजसह कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण, शाळा शौचालय व ब्लॉक टाकणे आदी कामे केली.

जाणार आहेत. सुमारे २ कोटी ४ लक्ष रुपयांच्या या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार टिंगरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात रखडलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.

सरपंच सिताराम उंद्रे, बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव, माजी उपसरपंच प्रकाश सावंत, उत्तम उंद्रे, कृष्णा उंद्रे, ग्रामपंचायत सदस्य रुपेश उंद्रे, सीमा सावंत, जयश्री हंकारे, वर्षा उंद्रे, माजी सरपंच शकुंतला उंद्रे, डॉ. शिवदीप उंद्रे, संजय उंद्रे, आप्पासाहेब मुरकुटे, हनुमंत उंद्रे, रविंद्र काकडे, सुरेखा उंद्रे आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी पुणे लोकसभेचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आमदार टिंगरे म्हणाले, "मांजरी खुर्द-कोलवडी रस्ता रूंदीकरण रखडले आहे. मात्र, बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय हे काम सुरू करता येणार नाही. त्यातून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीही दखल घेतली जाईल. वडगावशेरी मतदारसंघांत एकमेव असलेल्या या गावाला जास्तीत जास्त निधी देण्याचा माझा सतत प्रयत्न आहे.

गावची पाणीयोजना साकारण्यासाठी सर्व्हेक्षण केले जात आहे. लवकरच या योजनेला मंजूरी मिळेल. अजितदादांकडे आर्थमंत्री पद असल्याने अधिकाधिक निधी गावासाठी आणता येणार आहे. याशिवाय आमदार निधीही भरपूर आहे.

गावकऱ्यांनी कामे सूचविल्यास गावाचा चांगला विकास होईल. गावातील कामांवर ग्रामस्थांनी लक्ष ठेवावे. ठेकेदाराकडून फसवणूक होत असल्याचे समजल्यास तात्काळ काम बंद करायला सांगा.'साई गणेश पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक आव्हाळे व चिंतामणी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT