crime  sakal
पुणे

Pune: मुंढव्यात संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग

अजिंक्य रमेश सावंत (वय २६, रा. मेघवाडी, लालबाग, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे- एका संगणक अभियंता तरूणीसोबत लगट करून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (ता. ८) सकाळी मुंढवा केशवनगर परिसरात घडली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

अजिंक्य रमेश सावंत (वय २६, रा. मेघवाडी, लालबाग, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पीडित तरुणी ही येरवडा परिसरातील एका कंपनीत संगणक अभियंता आहे.

ती तिच्या दोन मैत्रिणींसमवेत मुंढवा केशवनगरमधील एका सोसायटीत भाडेतत्त्वावर राहते. पीडित तरुणीच्या एका मैत्रिणीचा बॉयफ्रेन्ड अजिंक्य सावंत हा मुंबईवरून सात एप्रिलला रात्री त्यांच्या घरी आला. त्यावेळी पीडित तरूणीच्या मैत्रिणीने अजिंक्य आणि या तरुणीची ओळख करून दिली. त्यांनी बाल्कनीमध्ये गप्पा मारल्या.

त्यानंतर पहाटे पीडित तरुणी ही तिच्या खोलीत झोपण्यासाठी गेली. त्यानंतर अजिंक्यने सकाळी साडेसातच्या सुमारास झोपेत असलेल्या तरुणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पीडित तरुणीला जाग आली.

ती घाबरलेल्या अवस्थेत तत्काळ खोलीच्या बाहेर पडली. तिने तिच्या मित्राला आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या वेळी आरोपीने त्याच्या मैत्रिणीलाही मारहाण केली. याबाबत पीडित तरुणीने तक्रार दिल्यावरून मुंढवा पोलिसांनी आरोपी अजिंक्य सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

MNS Candidates List: मनसेची सहावी यादी जाहीर, ३२ उमेदवारांची नावे, कुणाला मिळाली संधी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

Assembly Elections: उमेदवारी अर्जासाठी 2 दिवस शिल्लक, जाणून घ्या आतापर्यंत महायुती-मविआने किती उमेदवार जाहीर केलेत?

SCROLL FOR NEXT