Pune Sakal
पुणे

Pune : हडपसरच्या विकासात भाजीपाला सोसायटीचे योगदान मोलाचे ; खासदार शरद पवार

हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी सोसायटीच्या अमृतमहोत्सवानिमित्त खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोसायटीच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन .

सकाळ डिजिटल टीम

हडपसर - हडपसर भाजीपाला खरेदी विक्री सहकारी सोसायटीने शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या जीवनात स्थिरता देण्याचे काम केले. राजकीय मते काहिही असली तरी सामाजिक विकासासाठी इथले लोक सोसायटीच्या माध्यमातून एकत्र आले.

हडपसरचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात आज जो काही विकास झालेला आहे, त्यामध्ये भाजीपाला सोसायटीचे मोलाचे योगदान आहे, असे मत राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

येथील हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी सोसायटीच्या अमृतमहोत्सवानिमित्त खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोसायटीच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन, अमृतस्मृती गौरव अंकाचे प्रकाशन व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी स्वर्गीय रामभाऊ तुपे समाजसेवा पुरस्कार,

मगरपट्टा सिटीचे संस्थापक सतीश मगर यांना उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी स्वर्गीय अण्णासाहेब मगर उद्यमशीलता पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार पवार बोलत होते.

चेअरमन प्रवीण तुपे यांनी प्रास्तविक केले. गेल्या ७५ वर्षातील सोसायटीच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. हडपसर ते उरूळीकांचनच्या स्वतंत्र महापालिकेसाठी खासदार पवार यांनी लक्ष देण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली.

आमदार चेतन तुपे पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, महादेव बाबर, दिलीप तुपे, प्रशांत जगताप, राजलक्ष्मी भोसले, निलेश मगर, भारती शेवाळे, दत्तात्रय तुपे, सुभाष काळभोर, अनिल तुपे, रामराव गोगावले,

कार्यकारी संचालक जयप्रकाश जाधव, संचालक रमेश घुले, रतन काळे, युवराज शेवाळे, शिवाजीराव खोमणे, जिजाबा बांदल, रतन काळे, जे .पी. देसाई, विजय तुपे, बाळासाहेब गोगावले, राजेंद्र उंद्रे, विठ्ठल सातव, संजीवनी जाधव, सुजित गोगावले, रामभाऊ कसबे, संगीता तुपे, प्रमोद तुपे, शंकर पवार आदी यावेळी उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. आढाव म्हणाले, "मांजरी हडपसरचा भाग मुबलक पाण्यामुळे कायम समृध्द राहिला आहे. समृध्दीने शारिरीक विकास झाला मात्र, बौध्दिक विकासात आपण आजूनही मागे आहोत.

सध्या व्यक्तीची उपासना होत आहे, साहित्य व कलेची जोपासना होण्याची गरज आहे. जो चांगले करू पाहत आहे, त्याच्या प्रयत्नांना साथ द्या. हडपसर भाजीपाला सोसायटीने असा प्रयत्न केला आहे.'

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. नितीन लगड यांनी केले. तर व्हाईस चेअरमन साहेबराव काळे यांनी आभार मानले. दरम्यान, विद्यार्थी प्रमुख विक्रम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल ताशांच्या गजरात पवार यांचे झालेल्या स्वागताने उपस्थित भारावून गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT