remdesivir 
पुणे

पुण्यात 30 एप्रिलपर्यंत रेमडेसिव्हिरची रिटेल विक्री बंद; काळाबाजार रोखण्यासाठीचं पाऊल

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात रेमडेसिव्हिर औषधाचा काळाबाजार रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत रिटेल विक्री बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनाच तेथील मेडिकल दुकानात रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रुग्णालय आणि प्रशासनाची राहील, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. जिल्ह्यात रेमडेसिव्हिर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु काही रुग्णांना गरज नसताना रेमडेसिव्हिर दिले जात आहे. किरकोळ विक्रीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा छळ करण्यात येत आहे. ही बाब निदर्शनास आल्यामुळे रेमडेसिव्हिर केवळ रुग्णालयांच्या मेडिकल दुकानातच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे औषध घरी असलेल्या रुग्णांना घेता येत नाही. ते रुग्णालयातच घ्यावे लागते. त्यामुळे रुग्णालयांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हिर औषध बाहेरून आणण्यास सांगू नये, असे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यात तुलनेत पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे राज्य सरकारकडून जिल्ह्यात रेमडेसिव्हिर औषधांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात दररोज सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून रुग्णालयांना त्याचा नियमित गरजेनुसार पुरवठा करण्यात येणार आहे. रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देणे ही संबंधित रुग्णालय आणि प्रशासनाची जबाबदारी राहील. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रेमडेसिव्हिर औषधांचा तुटवडा भासणार नाही, असे राव यांनी स्पष्ट केले.

घरीच आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर औषधाची गरज भासल्यास त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणून डॉक्टरांच्या निगरानीखाली ते देण्यात येईल. त्यानंतर पुन्हा त्या रुग्णास घरी सोडण्यात येईल. त्यामुळे पुरेशा प्रमाणात बेड्सही उपलब्ध राहतील. मात्र, या संदर्भात सरकारच्या पातळीवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे, असे राव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: अजितदादांच्या खांद्यावर नरेश अरोरांचा हात... मिटकरींचा पक्षाला घरचा आहेर, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली?

Latest Marathi News Updates : इव्हीएमविरोधात लढाईसाठी विरोधकांची रणनीती

Nashik News : नवीन डांबरीकरण झालेले रस्ते खोदाईस मनाई; जुन्या खोदलेल्या रस्त्यांचा मागविला अहवाल

Hasan Mushrif : कागलमधून हसन मुश्रीफ विजयी झाले, पण..; काय सांगते मतदारसंघातील आकडेवारी, घाटगे पोहोचले जवळपास

Rajkumar Rao Fees: स्त्री २'च्या यशानंतर राजकुमार रावने वाढवली फी? ५ कोटींच्या चर्चेवर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT