शहरात आज नव्याने ७०९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या आता ४ लाख ६५ हजार ६२५ इतकी झाली आहे.
पुणे (Pune Corona Update)- शहरात आज नव्याने ७०९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या आता ४ लाख ६५ हजार ६२५ इतकी झाली आहे. शहरातील २ हजार ३२४ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ४६ हजार ९४२ झाली आहे. विशेष म्हणजे सलग चौथ्या दिवशी पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या एक हजाराच्या आत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन यांसदर्भातील माहिती दिली आहे.
पुणे शहरात आज एकाच दिवसात ९ हजार ०६६ नमुने घेण्यात आले आहेत. शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख ३६ हजार ४४६ इतकी झाली आहे. उपचार घेणाऱ्या १० हजार ६७६ रुग्णांपैकी १,२९१ रुग्ण गंभीर तर ४,००५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ००७ इतकी झाली आहे.
सलग चौथ्या दिवशी एक हजाराच्या आत रुग्ण !
नवे रुग्ण
■ २३ मे : ७०९
■ २२ मे : ८४०
■ २१ मे : ९७३
■ २० मे : ९३१
डिस्चार्ज
■ २३ मे : २,३२४
■ २२ मे : १,९४९
■ २१ मे : २,४९६
■ २० मे : १,०७६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.