राजेश कणसे
आळेफाटा - बाजार समितीत सोमवारी डाळींबाच्या २० किलोच्या एका क्रेटला मिळाला १४५०० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे अशी माहिती व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत असणाऱ्या उपबाजारात कांद्या प्रमाणे आता डाळिंबाचे देखील लिलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. त्यात शुक्रवारी झालेल्या बाजार.लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील शेतकरी विवेक अविनाश रायकर यांच्या डाळींबास वीस किलोच्या एका क्रेटला तब्बल १४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला आहे.
त्यामुळे डाळींब उत्पादक भलताच खुश झाला आहे. त्या खालोखाल त्याच्या दुसऱ्या डाळिंबाच्या एका क्रेटला ११ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.तर तिनं नंबर च्या एका विस किलोच्या क्रेट ला १० हजार रुपये तर चार नंबर च्या डाळिंबास ६ हजार रुपये व पाच नंबर च्या डाळिंबाच्या एका क्रेट ला ४ हजार रुपये बाजार भाव मिळाला आहे . तसेच मार्केट मध्ये २०० क्रेट विक्रीसाठी आले होते
या बाजार समितीत पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा,कर्जत,जामखेड, शिरूर, अहमदनगर या ठिकाणाहुन शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाजार पेठ आहे. या बाजार समितीत फळ लिलाव मोठ्या प्रमाणावर केले जातात. हे मार्केट कांदा लिलावासाठी प्रसिद्ध आहे,
पण डाळिंबाला एवढं भाव मिळाल्याने हे मार्केट चांगलेच चर्चेत आले आहे. डाळींबासाठी ही बाजारपेठ आता चर्चेत येऊ लागली आहे.तसेच दिवसेंदिवस डाळिंबाची आवक कमी होत चालल्याने डाळींबाच्या बाजार भावात वाढ झालेली आहे अशी माहिती डाळिंब आडतदार प्रविण लेंडे, निशीकांत ढोमसे नामदेव भुजबळ,संदीप कोरडे,विशाल कुटे,विजय कु-हाडे,संतोष कु-हाडे,संदीप लोढा,पप्पु सरोदे,चारूदत्त साबळे,गणेश गडगे,गोविंद गाडेकर,मियाभाई तांबोळी ,बारकु जाधव यांणी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.