Pune Crime sakal
पुणे

Pune Crime: कुसाळकर टोळीतील अठरा महिन्यांपासून फरारी गुन्हेगार गजाआड

Pune Gangwar News: पोलिस हवालदार दीपक चव्हाण, प्रमोद मोहिते, पोलिस कर्मचारी सचिन जाधव आणि महावीर वलदे सोमवारी रात्री गस्तीवर होते

सकाळ वृत्तसेवा

Latest Pune News: तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात १८ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. गावडे हा तम्मा कुसाळकर टोळीचा सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

धनंजय राजेंद्र गावडे (वय ३०, रा. नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर, पुणे) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावडे याच्याविरुद्ध सुमारे दीड वर्षांपूर्वी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी गावडेचा पोलिस शोध घेत होते.

पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस हवालदार दीपक चव्हाण, प्रमोद मोहिते, पोलिस कर्मचारी सचिन जाधव आणि महावीर वलदे सोमवारी रात्री गस्तीवर होते. त्यांना गावडे हा शिवाजीनगर परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

गावडे हा तम्मा कुसाळकर टोळीचा सदस्य असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी शिवाजीनगर, डेक्कन आणि विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीप गिल, सहाय्यक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT