काही दिवसापूर्वी, राजगडाच्या पायथ्याशी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका तरुणीवर तरुणाने कोयत्याने हल्ला केला. विशेष म्हणजे जीवावर उदार होत MPSC करणाऱ्या तरुणांनी तिला वाचवलं. (Pune Crime Koyta attack on girl in Sadashiv Peth MPSC student save her life )
सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकी जवळ घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झालेल्या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही घटना घडली आहे.
थरारक घटना....
आरोपी तरुण पीडित तरुणीला एकतर्फी प्रेमातून वारंवार त्रास देत होता. तिचा नकार असतानाही तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. मुलीच्या पालकांनी या मुलाच्या घरी देखील ही बाब सांगितली होती. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी त्याला समजावलं असल्याचीही माहिती समोर आली आहे. पण तरीही आरोपी तरुणानं पीडितेला जीवे मारण्याच्या इराद्यानं ही गोष्ट केली. पुण्यातील सदाशिव पेठेत भर रस्त्यात त्यानं तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला लागली. मात्र तिच्या मागे कोयता घेऊन धावणार्या तरूणाला पाहून सुरुवातीला कोणीच मदतीला पुढ आलं नाही.
जखमी अवस्थेत ती मुलगी धावत होती. एवढ्यात लेशपाल जवळगे नावाच्या एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणानं आरोपी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि हल्लेखोर तरणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.