Crime News  esakal
पुणे

Pune Crime : अल्पवयीन मुलींचा विनयभंग, शिक्षकास अटक

सकाळ वृत्तसेवा

शाळेतील अल्पवयीन मुलींना व्हॉटसअ‍ॅपवर ‘आय लव्ह यू’चा मेसेज पाठवून त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे - शाळेतील अल्पवयीन मुलींना व्हॉटसअ‍ॅपवर ‘आय लव्ह यू’चा मेसेज पाठवून त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ कार्यक्रमात समुपदेशनात या मुलींनी तक्रार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून या शिक्षकाविरुध्द कोंढवा पोलिस ठाण्यात विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा शिक्षक एका शाळेत शारीरीक शिक्षण विषयाचा शिक्षक आहे. त्याने शाळेतील चार अल्पवयीन मुलींना व्हॉटसअ‍ॅपवर ‘आय लव्ह यू’ मेसेज पाठविला. तसेच, त्यांना जबरदस्तीने मिठी मारून विनयभंग केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro Fire: नुकत्याच उद्घाटन झालेल्या 'मंडई मेट्रो' स्थानकाला भीषण आग! अग्निशमनच्या पाच गाड्या घटनास्थळी; आग नियंत्रणात

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT