कोरेगाव भीमा : शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या शेतमजुराच्या मुलाने त्याच्याच नातेवाईक असलेल्या दुसऱ्या मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने येत्या १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या विशाल दामोदर गायकवाड (वय २१, मुळ रा. हळणी ता. अहमदपूर, जि. लातूर) याची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीतील एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर शेतमजुर म्हणून पीडित मुलीच्या आई-वडीलांसह इतरही काही कुटुंबीय कामास आहेत.
पीडित मुलीचे आई-वडील बाहेर गेलेले असताना त्यांच्याच नात्यातील विशाल गायकवाड याने पीडीतेला बळजबरीने पकडून घरामागे नेत जीवे मारण्याची धमकी देवून बलात्कार केला. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगु नये, म्हणूनही धमकावले. या प्रकाराने भेदरलेल्या मुलीने याबाबत आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करून विशाल गायकवाड याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला तातडीने अटक केली. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून अधिक तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.
दरम्यान पिडीत मुलीला तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून तपास यंत्रणेवर कोणताही दबाव नसल्याचे सांगत या प्रकरणाशी फार्म हाऊस मालकाचा संबंध नसल्याचेही पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.