Avinash Bagwe Congress Sakal
पुणे

Pune Crime : "तीस लाख रुपये दे नाहीतर..."; माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरींपासून अनेक नेत्यांना धमक्यांचे फोन येत आहेत.

अक्षय बडवे

पुण्यात भाजपच्या नेत्यानपाठोपाठ आता काँग्रेसच्या नेत्याला सुद्धा धमकीचा फोन आला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना तीस लाख रुपये खंडणी मागणीसाठी फोन आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत स्वतः बागवे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार काल म्हणजेच चार मार्च रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास घडला. अविनाश बागवे यांना काल एका अज्ञात इसमाने व्हाट्सअप वर मेसेज करून "तीस लाख रुपये दे नाहीतर तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद करू" अशी धमकी दिली.

तसेच पुढे या व्यक्तीने, "तुला माहिती नाही आम्ही सात आठ जण आहोत. पोलिसांनी आमच्यामधील दोघांना जरी आत टाकलं तरी आम्ही तुझ्या ऑफिसच्या आणि घराबाहेर असतो" असा आणखी एक मेसेज आला. या सगळ्या प्रकरणानंतर अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

अज्ञात व्यक्ती विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे सुपुत्र आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश सरचिटणीस यांच्या नावाने खंडणी उकळण्याचा प्रकार घडला असतानाच काही दिवसातच भाजपचे नेते गणेश बिडकर यांना खंडणीसाठी फोन केला होता. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता काँग्रेसच्या नेत्याला नेमकी खंडणी कोणी मागितली याचा शोध पोलीस घेत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT