Murder ESakal
पुणे

Crime: बाईकवरून जाताना कट मारला, वादाला तोंड फुटले, दोघं थेट कॉलेजमध्ये घुसले, तरुण दिसला अन्... रक्तरंजित शेवटाने खळबळ

Vrushal Karmarkar

पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील टीसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मृतकासोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने घडवली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 15 दिवसांपूर्वी दुचाकीवरून जात असताना त्यांना कट देण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपी विद्यार्थी चाकू घेऊन पाठीमागे कॉलेजमध्ये आला होता, असे सांगण्यात येत आहे. तरुण समोर येताच त्याच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

या घटनेनंतर कॉलेज कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून एका आरोपीला ताब्यात घेतले तर दुसरा फरार झाला. याबाबत अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले की, मयत आणि दोघेही आरोपी अल्पवयीन आहेत, त्यामुळे आरोपींची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

अलिकडे पुणे आणि परिसरात कोयटा टोळीच्या कारवाया वाढल्या असून आता अशा घटना बारामतीपर्यंत पोहोचल्या आहेत. बारामतीसारख्या शांतताप्रिय शहरात या प्रकाराने नागरिकांना धक्का बसला आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंना भेटायला आलेले आदिवासी आमदार वेटींगवर; दुपारी 3 वाजताचा दिला होता वेळ

Video: मैदानातील लाईट्स गेले, २ तास खेळ थांबला अन् मग David Miller च्या वादळानं TKR चा हरवत रॉयल्सला पोहचवलं क्वालिफायर्समध्ये

Nashik Crime : मंत्री भुजबळ यांना धमकी; संशयिताला आष्टीतून अटक! शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची कामगिरी

Solapur: शिंदे सेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळे यांची भेट; चर्चेला उधान

Latest Marathi News Live Updates : खुनी आणि बलात्कार करणाऱ्याला किती वेळा पॅरोलवर सोडता येईल? - संजय राऊत

SCROLL FOR NEXT